कल्याण प्रतिनिधी : राहुल गांधी(Rahul Gandhi) यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महागड्या ब्रॅन्डचा टी शर्ट घा
कल्याण प्रतिनिधी : राहुल गांधी(Rahul Gandhi) यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महागड्या ब्रॅन्डचा टी शर्ट घातला. ज्या टी शर्टची किंमत 41 हजार होती असा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. यावरून भाजपच्या काही नेत्यांनी राहुल गांधी यांना ट्रोल देखील केले. मात्र हाच मुद्दा पकडत आता काँग्रेसकडून देखील भाजपावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेसच्या वतीने कल्याणमध्ये भाजपाच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मोदींचा दहा लाखांचा सूट चालतो, अनुराग ठाकुर यांच्या मुलाचा बरबरीचा टी शर्ट चालतो, मग राहुल गांधींचा टी शर्ट डोळ्यात का खूपतो? असा सवाल भाजपाला करण्यात आला आहे.
COMMENTS