Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बँकांनी कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट 31 मार्च पूर्वी पूर्ण करावे : नरेंद्र पाटील

सांगली : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प व्याज परतावा योजनेमधून  व्यवसाय, उद्य

स्वराज्य चांदवड तालुका पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर
शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी… सेन्सेक्स ६० हजारांच्या पार
कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठाणे-पालघर जिल्ह्यातील प्रश्‍न प्रामुख्याने सोडवू : चैतन्य दळवी

सांगली : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प व्याज परतावा योजनेमधून  व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज देण्यात येत आहे. या योजनेतून देण्यात येणार्‍या कर्ज प्रकरणांचे बँकांना उद्दिष्ट देण्यात आले असून  बँकांनी त्यांना देण्यात आलेल उद्दिष्ट 31 मार्च पूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनाअंतर्गत बँक कर्ज मंजूर प्रकरणांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक महेश हरणे, जिल्हा उद्योग  केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त ज. बा. करीम, महामंडळाच्या जिल्हा समन्वयक निशा पाटील यांच्यासह राष्ट्रीय व सहकारी बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बँकेमार्फत देण्यात येत असलेल्या सुविधा व ज्या योजनेतून कर्ज वितरीत करण्यात येते त्याची माहिती बँकेत दर्शनी भागात लावावी,  बँकेमार्फत देण्यात येत असलेल्या योजनांची माहिती ग्रामसभेत द्यावी, कर्ज योजनेबाबत बँकांनी मेळावे घ्यावेत. किरकोळ कारणास्तव कर्ज प्रकरणांचे अर्ज नामंजूर करू नयेत, त्रुटींची पूर्तता करण्यासाठी कर्जदाराला संधी द्या, अशा सूचना अध्यक्ष पाटील यांनी बैठकीत दिल्या.

COMMENTS