Homeताज्या बातम्यादेश

ग्राहकांच्या 26 किलो सोन्यावर बँक मॅनेजरचा डल्ला

तिरुअनंतपूरम : ग्राहकांनी सोने तारण ठेवलेल्या तब्बल 26 किलो सोन्यावर बँक मॅनेजरनेच डल्ला मारल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी माजी शाखा व्यवस

आजचे राशीचक्र सोमवार, ०४ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा
त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही  
दक्षिण आफ्रिकेतील शेतकर्‍यांची जयवंत शुगर्सला भेट; उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची पाहणी

तिरुअनंतपूरम : ग्राहकांनी सोने तारण ठेवलेल्या तब्बल 26 किलो सोन्यावर बँक मॅनेजरनेच डल्ला मारल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी माजी शाखा व्यवस्थापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केरळचा हा आरोपी तेलंगाणात असल्याची माहिती मिळाल्याने तेलंगाणा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून केरळ पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मधा जयकुमार असे या ग्राहकांच्या सोन्यावर डल्ला मारणार्‍या माजी शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे. मधा जयकुमार यान बँक ऑफ महाराष्ट्राच्या वडकारा शाखेतून हे सोने पळवले होते.
तामिळनाडूतील मेट्टुपलायम पाथी इथ राहणारा मधा जयकुमार हा बँक ऑफ महाराष्ट्रच्या वडकारा शाखेचा व्यवस्थापक होता. ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्याच्या जागी त्याने बनावट सोने ठेवून सगळ्या सोन्यावर डल्ला मारला. नव्याने पदभार घेतलेल्या व्ही इर्शाद यांनी ही बाब उघडकीस आणली. त्यामुळे त्यांनी तत्काळ वडकारा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला. मधा जयकुमार हा गेल्या तीन वर्षांपासून वडकारा शाखेचा व्यवस्थापक होता.

COMMENTS