नवी दिल्ली ः बांगलादेशचे एक खासदार भारतात आल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. कुटुंबीय आणि पक्षाचे कार्यकर्ते यांचा त्यांच्याशी मागील तीन दिवसांपासून को

नवी दिल्ली ः बांगलादेशचे एक खासदार भारतात आल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. कुटुंबीय आणि पक्षाचे कार्यकर्ते यांचा त्यांच्याशी मागील तीन दिवसांपासून कोणताही संपर्क झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यांचे शेवटचे ठिकाण बिहारमधील मुझफ्फरपूर येथे असल्याचे दाखवत आहे. बांगलादेशच्या जेनैदाह-4 मतदारसंघातील खासदार अनवारुल अजीम अनार हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. खासदार अनार यांचे स्वीय सहाय्यक अब्दुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार अनार 11 मे रोजी उपचारासाठी भारतात आले होते. सुरुवातीचे दोन दिवस त्यांचा कुटुंबीय आणि पक्षातील सदस्यांशी संपर्क झाला होता. मात्र, मंगळवारपासून त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे.
COMMENTS