Homeताज्या बातम्याविदेश

बांगलादेशने रावळपिंडीत इतिहास रचला

इस्लामाबाद ः बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौर्‍यावर आहे. दोन्ही संघात कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत यजमान पाकिस

निसर्ग गार्डन कात्रजची बैलगाडी ठरली बाबाराजे जावळी केसरीची मानकरी
माजी क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचे निधन
पाटणा बिहार येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मसूरचा सोहम मोरे सुवर्णपदकाचा मानकरी

इस्लामाबाद ः बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौर्‍यावर आहे. दोन्ही संघात कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत यजमान पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. बांगलादेश क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. बांगलादेशने कसोटी सामन्यात बलाढ्य पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने यजमान पाकिस्तानचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव 6 बाद 448 धावांवर घोषित केला. यानंतर संघ दुसर्‍या डावात 146 धावांवर सर्वबाद झाला

COMMENTS