Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वांद्रे शासकीय वसाहत: भूखंडाच्या निकषासाठीची समिती लवकरात लवकर गठीत करा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठीच्या भूखंडाबाबत निकष निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण

राजभवन येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘माय लेकरं’ कार्यक्रम संपन्न
हिंगोलीत युनीयन बँकेला आग
भीमजयंती दिनी डॉ.फुगारे यांच्या उपस्थितीत  पाणीवाटपाचे आयोजन

मुंबई : वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठीच्या भूखंडाबाबत निकष निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय झाला आहे. ही समितीत लवकरात लवकर गठीत करण्यात यावी, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्याची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत यासंदर्भाच सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस माजी आमदार किरण पावसकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते आणि गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या सहकारी संस्थेला भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय झाला असल्याचे पावसकर यांनी यावेळी सांगितले. या भूखंडाचा तपशील अधिकारी कर्मचारी यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची अर्हता, निकष निश्चित करण्यासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये शासन निर्णय जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार ही लवकरात लवकर गठीत करण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी बैठकीतूनच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून संवाद साधत लवकरात लवकर समिती गठीत करण्याबाबत सूचना दिल्या.

COMMENTS