झाकीर नाईकच्या संघटनेवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झाकीर नाईकच्या संघटनेवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली

नवी दिल्ली : मलेशियाला पळून गेलेला वादग्रस्त मुस्लिम उपदेशक झाकीर नाईक याच्या ’इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ (आयआरएफ) या संघटनेवरील बंद 5 वर्षांसाठी वाढव

बार्शी फटाक्याच्या स्फोटाने हादरले 9 कामगारांचा मृत्यू, 3 महिला गंभीर जखमी
राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरवण्याची चिन्हे
राज्यपालांचा राजीनामा आणि काही प्रश्‍न ?

नवी दिल्ली : मलेशियाला पळून गेलेला वादग्रस्त मुस्लिम उपदेशक झाकीर नाईक याच्या ’इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ (आयआरएफ) या संघटनेवरील बंद 5 वर्षांसाठी वाढवली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आज, मंगळवारी यांसदर्भात अधिसूचना जारी केलीय. बेकायदेशीर कारवायांमधील सहभागाबद्दल ’इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर 2016 मध्ये बंदी घालण्यात आली होती. सरकारने या संघटनेला बेकायदेशीर घोषित केलेय.
गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार आयआरएफ संघटना देशासाठी हानीकारक असणार्‍या कारवायांमध्ये आघाडीवर आहे. ही संघटना देशातील शांतता आणि धार्मिक सौहार्द देखील बिघडवण्याची शक्यता आहे. तसेच या संघटनेमुळे देशाच्या धर्मनिरपेक्ष ढाच्याला बाधा पोहचण्याची शक्यता असल्याकारणाने ही कारवाई करण्यात येत आहे. गृह मंत्रालयाने म्हटले की, आयआरएफचा अध्यक्ष झाकीर नाईक यांच्याद्वारे करण्यात येणारी वक्तव्ये आणि भाषणे ही वादग्रस्त आहेत. झाकीर नाईक आपल्या भाषणांद्वारे दोन धर्मांत तेढ निर्माण होऊन वैरभाव उत्पन्न होईल, अशी वक्तव्ये करतात. झाकीर नाईक भारतात तसेच विदेशात मुस्लीम युवकांना दहशतवादी कृत्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करत असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. नाईक आंतरराष्ट्रीय सॅटेलाइट टीव्ही नेटवर्क, इंटरनेट, प्रिंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लाखो लोकांसमोर मूलगामी विधाने आणि भाषणे करतात, जी प्रक्षोभक आहेत, असेही त्यात म्हटले आहे.

COMMENTS