Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय, खासगी कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ वापरावर बंदी

नियमाचे उल्लंघन केल्यास 200 रुपयांचा दंड

अहमदनगर/प्रतिनिधी ः शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयात तसेच कार्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांवर निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारन

आघाडी सरकारमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणावर मतभेद l पहा LokNews24
आमदार रोहित पवारांना ईडीचे समन्स
पढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

अहमदनगर/प्रतिनिधी ः शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयात तसेच कार्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांवर निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जनसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आणि शासकीय इमारती स्वच्छ राहण्यासाठी ‘स्वच्छ भारत स्वस्थ भारत’ मोहिमेद्वारे शासकीय इमारतीची साफसफाई करुन शासकीय कार्यालये आणि परिसर हा ‘तंबाखू मुक्त परिसर’ म्हणून जाहीर केला आहे. त्याच्या अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढलं आहे. सार्वजनिक ठिकाणी ज्यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये, शासकीय संस्था, कार्यालयातील कामाची जागा, उपहारगृहे, शाळा आणि महाविद्यालये यांचा समावेश होतो तेथे नागरिकांच्या संरक्षणाकरिता सिगारेट, तंबाखू, तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा 2003 च्या कलम 4 अन्वये तंबाखू खाणे / थुंकणे / धूम्रपान करण्यास प्रतिबंध आहे. शासकीय इमारतीच्या परिसरातमध्ये धूम्रपान आणि थुंकणे हा दंडात्मक गुन्हा आहे त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने परिपत्रकात म्हटलं आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍याच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीला 200 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. शासकीय इमारतीची साफसफाई नियमित करण्यात यावी तसेच तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या निषेधार्थ शासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ या संबंधित फलक लावण्यात यावा. शासकीय इमारतीच्या मुख्यद्वार, इतर द्वार जिथून इमारतीत प्रवेश होतो तसेच प्रत्येक मजल्यावर लिफ्ट शेजारी आणि विविध भागांपुढे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या निषेधार्थ फलक लावण्यात यावा.

या फलकामध्ये पुढील सूचना इंग्रजी अथवा स्थानिक भाषेत इमारतीमध्ये आणि आवारात नमूद कराव्यात. सिगारेट अथवा तंबाखूजन्य उत्पदाने वापरण्यास मनाई / बंदी आहे, असे आढळून आल्यास 200 रुपये इतका दंड आकारण्यात येईल.
सदर फलकाच्या खालील बाजूला ज्या अधिकार्याकडे तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची जबाबदारी दिली आहे त्याचे नाव, पदनाम आणि दूरध्वनी क्रमांक छापण्यात यावा. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी खासगी कार्यलये, उपहारगृहे, शाळा / महाविद्यालये त्यांनी त्यांचे कार्यालयातील जबाबदार व्यक्तीची यासाठी नेमणूक करावी.
धूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनाने तरुणांना / युवापिढीला आणि जनसामान्यांना दूर ठेवण्यासाठी केंद्र शासनाने सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने ( जाहिरात, प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे नियमन ) कायदा 2003 ( कोटपा कायदा 2003 ) तयार केला आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने तसेच धुम्रपानामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. असंसर्गजन्य रोगांमधील कर्करोग, हृदयविकार, मानवी हृदयाशी निगडित रोग, फुफुसांचा कर्करोग यासारखे गंभीर आजार होतात. भारतात दरवर्षी होणार्या मृत्यूंमध्ये 8 9 लाख मृत्यू हे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतात. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्याने आणि थुंकल्याने त्यातून स्वाईन फ्लू, क्षयरोग, निमोनिया आणि पोटाचे विकार इत्यादी संसर्गजन्य आजार पसरतात.

COMMENTS