Homeताज्या बातम्यादेश

पश्‍चिम बंगालमध्ये ‘द केरला स्टोरी’च्या प्रदर्शनावर बंदी

कोलकाता/वृत्तसंस्था पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यात वादग्रस्त ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. राज्

वाडिया पार्कमध्ये रंगणार छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांचा वारणावती येथील वन्यजीव कार्यालयावर मोर्चा
लातूरमध्ये महिला आयोगाच्या सुनावणीत 93 तक्रारींचा निपटारा

कोलकाता/वृत्तसंस्था पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यात वादग्रस्त ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना हा चित्रपट थिएटर्समधील स्क्रीनवरून काढून टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी, राज्यात शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे, असं ममता बॅनर्जी हा आदेश देताना म्हणाल्या.
‘द केरला स्टोरी’ 5 मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, आधी ते काश्मीर फाईल्स घेऊन आले होते, आता ही केरळची कहाणी आहे आणि नंतर बंगाल फाईल्सची योजना आखत आहेत. भाजपा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहे? केरला स्टोरी हा चित्रपट चुकीच्या तथ्यांसह केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. द काश्मीर फाईल्स म्हणजे काय? हा चित्रपट काश्मिरी लोकांचा अपमान करण्यासाठी होता. ‘द केरळ स्टोरी’ म्हणजे काय? ही रंगवलेली कथा आहे, असं पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. दरम्यान, ममता बॅनर्जी या दुसर्‍या बिगर-भाजपा मुख्यमंत्री आहेत ज्यांनी आपल्या राज्यात ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. यापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही चित्रपटाबाबत असेच आदेश जारी केले होते.

COMMENTS