Homeताज्या बातम्यासंपादकीय

सातासमुद्रापार जातीप्रथेवर बंदी !

भारताच्या उत्तर भारतातील राजकीय प्रस्थ असलेले स्वामी प्रसाद मौर्य या हिंदू ओबीसी व्यक्तिमत्व एका हिंदू साधूने अपमानित केल्याची घटना घडत असताना, त

ललित पाटील प्रकरणाचे वास्तव! 
बाळासाहेबांच्या राजकीय भूमिकेतील अस्पष्टता ! 
मोपलवार म्हणजे सत्ता-प्रशासानाचा नेक्सस !

भारताच्या उत्तर भारतातील राजकीय प्रस्थ असलेले स्वामी प्रसाद मौर्य या हिंदू ओबीसी व्यक्तिमत्व एका हिंदू साधूने अपमानित केल्याची घटना घडत असताना, तिकडे सातासमुद्र पार असणाऱ्या अमेरिकेत त्याच वेळी सिटल या अमेरिकन शहरात जाती आधारित भेदभावाला आणि अन्यायावर बंदी आणत, जातीय प्रथा पाळण्याविरोधात बंदी करण्यात आली असून, या संदर्भात विशेष कायदाच करण्यात आला. भारतीय माणूस, जे विशेष करून भारत आणि नेपाळ या दोन्ही देशातील माणसे जगात ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी सोबतीला आपली जातीव्यवस्था किंवा तिचा संसर्ग घेऊन जातात. जातीव्यवस्थेमध्ये सर्वात वरचा घटक असणाऱ्या जाती  या देशातून सर्वात आधी सातासमुद्र पार गेल्या. मात्र, त्यांनी धर्मशास्त्रानुसार बहुजन समाजाला सातासमुद्र पार जाण्यास बंदी केली होती. कारण धर्मशास्त्रांची ती बंधने होती. धर्मशास्त्रांमध्ये बहुजन किंवा खालच्या जातीचा माणूस जर सातासमुद्र पार गेला तर महापाप घडते. परंतु, आज अमेरिकेच्या सिटल शहरात झालेला कायदा जर आपण पाहिला, तर त्यातून हेच निदर्शनास येते की, युरोपीय देशांमध्ये किंवा विकसित देशांमध्ये गेलेला भारतीय माणूस – जो खालच्या जात समूहातून – जातो बहुजन समाजातून जातो, त्या माणसाची बौद्धिक जागृती त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात घडून येते. त्यामुळे त्या ठिकाणी आधीच वसलेल्या उच्च जातीयांकडून त्यांच्या विरोधात जे जातीय दमण किंवा जातीय अन्याय होतात, त्या विरोधात तिथे दाद मागितली जाते. केवळ दादच नव्हे, तर अशा प्रकारचा अन्याय कसा अमानवीय आहे, हे तेथील प्रशास व्यवस्थेला पटवून त्या विरोधात जाहीर मतदान घेऊन जातीव्यवस्था विरोधात कायदे बनवले जातात. ती निकाली काढले जाते. अर्थात, या संदर्भात ब्रिटनमध्ये देखील काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीचा कायदा झाला. ज्या कायद्याने ब्रिटनमध्ये जातीव्यवस्था पाळण्यावर बंदी आणण्यात आली. ही बंदी आणण्यासाठी भारतातून बहुजन समाजातील जे लोक युरोपमध्ये किंवा ब्रिटनमध्ये गेली, त्यांनी तेथील उच्च जातींची मानसिकता अजूनही जातीय अन्यायाची आहे, अत्याचाराची आहे, हे तेथील शासन – प्रशासनाला पटवून दिले. ब्रिटनमध्ये देखील जातीय भेदभावावर बंदी करणारा आणि जातीव्यवस्था पाळणाऱ्या व्यवस्थेवर कायद्याने बंदी लादण्यात आली आहे. हे सातासमुद्र पार गेलेल्या बहुजन समाजाने मिळवलेले यश आहे, असा याचा अर्थ होतो! शितल शहरात जातिव्यवस्थेवर केलेल्या बंदिनी तेथील बहुजन समाजाच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून त्या अनुषंगाने अतिशय प्रगत अशा देशात उभी राहिलेली जाती व्यवस्था ही खास करून भारतीयांनी नेपाळी नागरिकांमध्ये दिसून येते तिच्यावर आणलेली बंदी ही ऐतिहासिक घटना असल्याचे वर्णन बहुजन विद्वानांनी आणि नागरिकांनी केले आहे.  त्याच वेळी हिंदू अमेरिकन फाउंडेशनचे सुहाग शुक्ला यांनी जातीव्यवस्थेवर आधारित भेदभाव हा हिंदुत्वज्ञानाच्या मूलभूत सिद्धांताच्या विरोधी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, सुहाग शुक्ला यांचे मत हे नेहमीपेक्षा वेगळे आहे, असे नाही. कारण, भारतात अशा प्रकारचे सिद्धांत मोठ्या प्रमाणात चर्चिले जातात. परंतु, त्यावर कृती मात्र शून्य होते. त्यामुळे खरी गरज आहे, या विरोधात कृती करण्याची! अमेरिकेच्या सिटल शहरात झालेला हा कायदा, याची परिणती जगात आता उमटेल. जगभर, ज्या ठिकाणी भारतीय समाज गेलेला आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे कायदे करण्याची मोहीम आता मोठ्या प्रमाणात सुरू होईल, हे या प्रकरणावरून निश्चितपणे म्हणता येईल.

COMMENTS