Homeताज्या बातम्यादेश

जैश-ए-मोहम्मदशी संबंधित काश्मीर टायगर्सवर बंदी घाला

इंडियन मुस्लिम असोसिएशनचे मुहम्मद शेख यांची मागणी

नागपूर ः देशातील जम्मू-काश्मीर खोर्‍यात गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून दहशतवाद्यांकडून राजौरी, कुपवाडा, डोडा

शिवसेने आणि काँग्रेस आमने सामने ;दोन्ही गटात तुफान राडा LOK News 24
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचे निधन
‘खंडेराया झाली माझी दैना रे..’

नागपूर ः देशातील जम्मू-काश्मीर खोर्‍यात गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून दहशतवाद्यांकडून राजौरी, कुपवाडा, डोडा यांसारख्या भागांना लक्ष्य केले जात आहे. या भागात दहशतवादी सतत लष्कराच्या वाहनांवर अथवा चौक्यांवर हल्ले करत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने जैश-ए-मोहम्मदशी संबंधित काश्मीर टायगर्स संघटनेचा हात असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी इंडियन मुस्लीम असोसिएशन-नुरी संघटनचे राष्ट्रीय सचिव मुहम्मद शेख यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये अनेक भारतीय जवानांना हौतात्म्य मिळाले असून सामान्य नागरिकांनीही आपले प्राण गामावले आहेत. या हल्ल्यांची जबाबदारी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांनी घेतली आहे. ‘इंडियन मुस्लीम असोसिएशन- नुरी’चे राष्ट्रीय सचिव मुहम्मद एबाद शेख यांनी पत्र लिहित जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारणारे गट हे वहाबी पंथ मानणारे असल्याची बाब लक्षात आणून दिली आहे. त्यांनी आपल्या पत्रात्त म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे, राजौरी, कुपवाडा, डोडा यांसारख्या भागात दहशतवादी सतत लष्करावर हल्ले करत आहेत. प्रदीर्घ काळाच्या शांततेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेले हे हल्ले पाकिस्तानशी जोडले जात आहेत. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित काश्मीर टायगर्सने या भागात घडलेल्या अनेक घटनांची जबाबदारी स्वीकारली आहे. यातून स्पष्टपणे लक्षात येते की, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ज्यांना भारतात अशांतता पसरवायची आहे, अशा संघटनांचा हात यामागे आहे. दुसरीकडे, भारतीय लष्कराचे जवान या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊन हे हल्ले हाणून पाडत आहेत, असे ते म्हणाले आहेत. 

COMMENTS