Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बळीराजा शेतकरी संघटनेचे कराडमध्ये धरणे आंदोलन

कराड / प्रतिनिधी : उसाची एकरकमी एफआरपीसह सहाशे रुपये जादा दर देण्याच्या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरा

सांगलीत महापूर काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा
महावितरणच्या अधिकार्‍यांची मनमानी; थकबाकी वसूलीसाठी संपूर्ण विज पुरवठा बंद
थंडीचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या

कराड / प्रतिनिधी : उसाची एकरकमी एफआरपीसह सहाशे रुपये जादा दर देण्याच्या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरावर काढलेली संघर्ष यात्रा पोलिसांनी येथील दत्त चौकात रोखली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविल्यानंतर त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, प्रदेश युवाध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, सांगली जिल्हाध्यक्ष उन्मेश देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष रामदास खराडे, जयंत गायकवाड, माऊली जवळेकर, धनाजी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बळीराजा शेतकरी संघटनेने आज येडेमच्छिंद्र ते कराड अशी पायी संघर्ष यात्रा काढण्यात आली. दुपारी चारच्या सुमारास ही संघर्ष यात्रा कराडला पोहोचली. कार्वे नाका, पोपटभाई पेट्रोल पंपमार्गे दत्ता चौक व तेथून सहकामंत्री पाटील यांच्या घरावर ती संघर्ष यात्रा जाणार होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी काढलेली संघर्ष यात्रा दत्त चौकात अडविली. तेथेच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना थांबविले. ऊसदरप्रश्‍नी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमिवर कराड शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. शहरात जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी रोखले होते. बळीराजा शेतकरी संघटनेने कराड शहरातील दत्त चौकात रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. सहकारमंत्री पाटील यांच्या निवासस्थानी धडकणारी यात्रा अखेर तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आली. तेथे सभेत त्याचे रूपांतर झाले.
अध्यक्ष पाटील म्हणाले, उसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिजे. या मागणीसाठी संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होते. शासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. परंतू, कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही त्यांच्या दारात ठिय्या दिल्यासारखे आहे. शेतकर्‍यांना त्यांच्याच हक्काचे पैसे मागण्यासाठी आंदोलने करावी लागत आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. साखरेला 2800 रुपये दर असताना शेतकर्‍यांना जो दर मिळत होता. तोच दर 3600 रुपये झाला तरीही तो दर मिळत आहे. त्यामुळे यापुढे शेतकर्‍यांची पिळवणूक खपवून घेणार नाही. जोपर्यंत उसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळत नाही. तोपर्यंत आम्ही येथेच ठिय्या आंदोलन करणार आहे.

COMMENTS