Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेब थोरात यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर

संगमनेर ः काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शा

संगमनेर तालुक्यासाठी 128 कोटींचा पिक विमा मंजूर
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची वृत्त लोकांची दिशाभूल करणारे
राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्‍वेतपत्रिका काढा

संगमनेर ः काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे 2018-19 चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला आहे.
1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित करताना आमदार थोरात यांनी सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर राज्यात महसूल कृषी शालेय शिक्षण अशी महत्त्वाची पदे भूषवताना अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्ष पद सांभाळले. पक्षाशी एकनिष्ठता, नेतृत्वाचा विश्‍वास, मोठा जनाधार, शांत संयम व सुसंस्कृत नेतृत्व अशी आमदार थोरात यांची राज्यभर ओळख असून महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय साहित्य कला क्रीडा शिक्षण कृषी सहकार अशा सर्व क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सध्याच्या विधानसभेत सलग आठ वेळा आमदार झालेले सर्वात ज्येष्ठ सदस्य आमदार थोरात हे असून त्यांचा सर्व पक्षांमध्ये मोठा आदर असतो. अभ्यासपूर्ण मांडणी, प्रत्येकाचा सन्मान यामुळे आमदार थोरात यांना यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून राज्यात गौरविले जाते.

COMMENTS