Homeताज्या बातम्यासंपादकीय

बाळासाहेब ठाकरे आणि राजकीय उणीव !

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून, पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आणि आता वेगवेगळ्या पक्षात कार्यरत असलेले, अनेक माज

महाराष्ट्राचे पहिले गैर काॅंग्रेसी मुख्यमंत्री !
अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अजितदादांचा नकार ?
आरक्षणात आरक्षण हवे! 

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून, पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आणि आता वेगवेगळ्या पक्षात कार्यरत असलेले, अनेक माजी शिवसैनिक, त्याचबरोबर शिवसेनेची जी दोन शकले झाली; त्यातील एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट, या दोघांचेही स्वतंत्र मेळावे झाले. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी प्रामुख्याने पुढे येते आहे. खरेतर, बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात उगवलं, ते पाहता तत्कालीन सत्ताधारी असणाऱ्या पक्षांच्या विरोधात जो असंतोष सर्वसामान्यपणे ओबीसी समुदायात उमटला होता, त्या ओबीसी समुदायाने बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी केली होती.  त्याच शक्तीमुळे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या पक्षांना महाराष्ट्राच्या भूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शह देण्यात यश मिळालं. १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार पहिल्यांदाच बनलं होतं; त्यानंतर शिवसेनेची घोडदोड राजकारणामध्ये सातत्याने वाढत गेली. मधल्या काळात ते सत्तेबाहेरही गेले. त्यानंतर २५ वर्षाची अखंड युती, जी भाजपा बरोबर होती; ती, देखील  तुटली. ही युती तुटल्यानंतर शिवसेनेची दोन शकले होण्यात त्याची परिणती ही झाली. परंतु, कोणत्याही प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला लोकांच्या समोर आणू शकेल, असं नेतृत्व मात्र तयार झालं नाही. त्यांच्याच भांडवलावर आजही माझी शिवसैनिक  वेगवेगळ्या पक्षात असले तरी, त्यांची खरी शक्ती ही बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व होतं. आज शिवसेनेची दोन शकले होऊन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे स्वतंत्र नेतृत्व करत असले तरीही, दोन्ही नेतृत्वांकडे बाळासाहेब ठाकरे यांची किमया नाही! राज ठाकरे यांच्याकडे केवळ त्यांची नक्कल आहे. त्यामुळे, बाळासाहेब ठाकरे यांची उणीव महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीने जाणवते आहे, ते पाहता ती उणीव यापैकी कोणतेही नेतृत्व भरून काढू शकत नाही! याची जाणीव स्वतः त्या नेतृत्वांनाही आहे. मात्र, एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणावर ठासून बोलणारा आणि बोललेले शब्द कधीही माघारी न घेणारा नेता म्हणून, जी प्रतिमा बाळासाहेब ठाकरे यांची उभी राहिली, त्याला अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात तोड नाही. प्रत्येक प्रश्नावर व्यक्त होण्याची त्यांची एक लकब वेगळी होती. सुरुवातीच्या काळात भाषीय भेदातून, नंतर प्रांतीय भेदातून आणि मग शेवटी धर्मांध स्वरूपातून अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांनी त्यांनी आपल्या राजकारणाला पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता प्राप्ती पर्यंत यश मिळाले, हे मात्र निश्चित! अजूनही, बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाची भुरळ असणारे अनेक नेते महाराष्ट्राच्या भूमीवर राजकीय दृष्ट्या सक्रिय आहेत. ते वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्या मनात शिवसेना प्रमुखांच्या विषयी असणार स्थान आजही आढळ आहे. ते स्थान असल्यामुळेच त्यांच्या मुखातून बाळासाहेब ठाकरे यांच्याकरिता ‘भारतरत्न’ ची मागणी पुढे आली आहे. अर्थात, भारतामध्ये हा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देताना, निश्चितपणे काही निकष आहेत. ते निकष भारतीय जीवन पद्धतीला आणि लोकशाहीला पूरक आणि पोषक असतील तर, निश्चितपणे या पुरस्कारापर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे पुन्हा या व्यक्तिमत्त्वाचं एक प्रकारे भारताच्या राजकीय पटलावर नव्या पद्धतीने चिंतन होत राहील असे निश्चित वाटते.

COMMENTS