Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कनगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बाळासाहेब गाढे  

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील कनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच जुबेदाबी महमदभाई इनामदार यांनी राजीनामा दिल्याने, ग्रामपंचायत कार्याल

घरफोडी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार पोलिसांकडून अटक
LokNews24 l नियमाचे काटेकोरपणे पालन न केल्याने लॉकडाउनबाबत नियोजन करा ; उद्धव ठाकरे
हमारी माँगे पुरी करो…कष्टकर्‍यांचा घुमला आवाज

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील कनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच जुबेदाबी महमदभाई इनामदार यांनी राजीनामा दिल्याने, ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते बाळासाहेब गाढे यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सर्जेराव घाडगे होते.
कनगर ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल  करण्याची मुदत सकाळी दहा ते बारापर्यंत होती. मुदतीत बाळासाहेब गाढे यांचा एकमेव अर्ज आल्याने अर्जाच्या छाननी नंतर अध्यक्ष सर्जेराव घाडगे यांनी बाळासाहेब गाढे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गाढे, आश्‍विनी संदीप घाडगे, नंदाकिनी भगवान घाडगे, जुबेदबी महमदभाई इनामदार, छायाताई गाढे, भाऊसाहेब आडभाई, मनीषा राजेंद्र दिवे, सीमाताई गोरक्षनाथ घाडगे धनंजय बर्डे, रामदास दिवे, अर्चना रंगनाथ घाडगे आदी सदस्य तर ग्रामसेवक संभाजीराव निमसे उपस्थित होते. सरपंच सर्जेराव घाडगे यांनी उपसरपंच निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व सर्व सदस्यांनी नूतन उपसरपंच बाळासाहेब गाढे यांचा सत्कार करून अभिनंदन केले. उपसरपंच बाळासाहेब गाढे यांचे ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय दादा विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, सुभाष पाटील, रावसाहेब (चाचा) तनपुरे राजेद्र साबळे, दत्तात्रय गाढे, बाबुराव घाडगे, भाऊसाहेब नालकर, गोरक्षनाथ गाढे, डॉ. रघुनाथ नालकर, आण्णासाहेब घाडगे, बाबुराव निमसे, संदीप घाडगे, दादासाहेब घाडगे, विजय गोरे आदींसह  भारतीय जनता पक्षाच्या नेते व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.

COMMENTS