Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाल संस्कार शिबिरे आयुष्याची शिदोरी ः भगवान महाराज मोरे

देवळाली प्रवरा ः जग बदलत चाललय शिक्षण पद्धती बदलल्या आज शिक्षण पद्धत आधुनिक शिक्षण देवू शकते.परंतू संस्कारक्षम शिक्षण देवू शकत नाही.त्यामुळे बदलत

अकोले रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी माजी प्राचार्य सातपुते
स्पर्धेत भाग घेतल्यानेच विद्यार्थ्यांची होईल प्रगती : देवदान कळकुंबे
शैक्षणिक संस्थांनी कौशल्य आधारीत अभ्यासक्रम तयार करावे ः डॉ. पराग काळकर

देवळाली प्रवरा ः जग बदलत चाललय शिक्षण पद्धती बदलल्या आज शिक्षण पद्धत आधुनिक शिक्षण देवू शकते.परंतू संस्कारक्षम शिक्षण देवू शकत नाही.त्यामुळे बदलत्या युगात व बदलत्या परिस्थिती मध्ये धार्मिक व संस्कृतिक परंपरा कायम राहव्यात यासाठी बाल संस्कार शिबीरे आयुष्याची शिदोरी ठरणार आहेत. ती काळाची गरज बनल्याचे प्रतिपादन संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.भगवान महाराज मोरे यांनी केले आहे. देवळाली प्रवरा येथे श्री त्रिंबकराज स्वामी शैक्षणिक व वारकरी संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या  मोफत  बाल संस्कार शिबिराला महंत उद्धव महाराज यांनी सदिच्छा भेट दिली.
              भगवान महाराज मोरे यावेळी म्हणाले की मनुष्य जिवनात योग्य वेळी झालेले संस्कार हे त्याचे हयात भर परिणामकारक ठरतात व त्यामुळे भावी आयुष्य संस्कारमय, भक्तिमय, शिस्तमय होते.देवळाली प्रवरा शहारात  बाल  संस्कार शिबाराच्या माध्यमातून धार्मिक शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षण दिले जात असल्याने आपले आई वडीलाचा आदर करणे,मानवता धर्म जोपसने हे या मुलांना शिकवले जात आहे. हे शिबीर आयोजन करणारे,व शिबिरासाठी योगदान देणार्‍या सर्व नागरिकांना धन्यवाद दिले.देवळाली येथील शिबीराचा बोध घेउन इतरत्र ही असे शिबीर आयोजित करावे असे आवाहन भगवान  महाराज मोरे यांनी केले आहे.
                शिबिरा दरम्यान अनिल येवले,छञपती संभाजीनगर खंडपीठाचे अँड बबनिश शेळके,डाँ.सागर जयस्वाल,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, प्रा. महेश शेळके, राहुल कराळे, शिवव्याख्येते हसन सय्यद, देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे आदीचे व्याख्यान आयोजित केले होते. बाल संस्कार शिबिराचे शिक्षक बाबा महाराज मोरे, भगवान महाराज मोरे  यांनी संस्कार व धार्मिक, अध्यात्मिक माहिती, कौटुंबिक माहिती या विविध विषयां बरोबरच विद्यार्थ्यांना स्लोक, अभंग, गौळणी, हरिपाठ, पाऊली शिकवून दररोज नित्य नियमाने मुलांनी आई वडील आजी आजोबा व वडिलधार्‍या माणसांच्या पाया पडणे, दररोज जेवण करताना चा स्लोक, झोपण्यापूर्वी चा स्लोक, झोपातून उठल्यावर म्हणण्याचा स्लोक शिकवून आदी मुलांवर संस्कार  करण्याचे काम करीत आहेत. बाल संस्कार  आयुष्याची शिदोरी ठरणार आहे.बाल संस्कार शिबिरास यशस्वीतेसाठी आबा महाराज कोळसे, सुभाष महाराज विधाटे, नामदेव महाराज जाधव शास्त्री,सोमनाथ महाराज माने, अतुल महाराज भुजाडी, उदय महाराज घोडके, भारत महाराज धावणे, अशोक बापू भुजाडी, भाऊसाहेब महाराज माने, अर्जुन महाराज तनपुरे आदींचे सहकार्य लाभले. शिबिराच्या सांगते प्रसंगी शहरातून बाल वारकर्‍यांची दिंडी काढण्यात आली.साईबाबा मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या वतीने बाल वारकर्‍यांना नाष्टा देण्यात आला. बाबा महाराज मोरे यांनी  बाल  संस्कार शिबिराची माहिती प्रस्ताविकमध्ये दिली. माजी नगरसेवक सचिन ढूस, दत्ता गागरे, बाबासाहेब सांबारे,अण्णासाहेब महांकाळ, विठ्ठल टिक्कल, एल. पी. गागरे, संचालक मंजाबापू वरखडे,आदिसह नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिन ढुस, बाबासाहेब सांबारे, यांच्या सह श्री त्रिंबकराज स्वामी शैक्षणिक व वारकरी संस्थेचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS