Homeताज्या बातम्यादेश

सत्येंद्र जैन यांना उपचारासाठी जामीन मंजूर

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उपचारासाठी हा दिलासा दिला आहे. न्

भाजपमध्ये या, अन्यथा जेलमध्ये जा असा काळ
अभियंता महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्काराचा प्रयत्न
भांडवलदारांची घसरलेली संपत्ती आणि वास्तव !

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उपचारासाठी हा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना 6 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. यादरम्यान, त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेता येणार आहे. न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना दिल्ली सोडता येणार नाही. न्यायालयाचा हा आदेश 11 जुलैपर्यंत लागू राहणार आहे. याबाबत आगामी 10 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, जे उपचार केले जातील, त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा असेही न्यायालयाने जामीन मंजूर करताना सूचित केले आहे.

COMMENTS