Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हडपसरचा बादशाह रिल्समधून पोलिसांनाच देतोय आव्हान

पुणे प्रतिनिधी - पुण्यात तरुणांकडून सोशल माध्यमावर गुन्हेगारींचे उदातीकरण करण्यात येत आहे. पुण्याच्या हडपसरमधून एक तरुण सोशल मीडियाच्या माध्यम

मोनिकाताई राजळे आमची बहिण – प्रतापकाका ढाकणे
लाच प्रकरणी सिडकोचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
’मोचा’ चक्रीवादळ धडकणार

पुणे प्रतिनिधी – पुण्यात तरुणांकडून सोशल माध्यमावर गुन्हेगारींचे उदातीकरण करण्यात येत आहे. पुण्याच्या हडपसरमधून एक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचं उदातीकरण करत थेट पोलिसांना आव्हान देतोय.  या तरुणाने थेट सोशल माध्यमावर येत एक रील्स बनवला आहे. त्या रिल्समध्ये तरुण म्हणतो, हे हडपसर गाव आहे, इथं दुनियादारी नाही गुन्हेगारी चालती. त्याने बादशाह नावाचं रिल्स बनवून थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. सोशल माध्यमावर अशा पद्धतीचे रिल्स बनवून समाजामध्ये भीतीच वातावरण तयार करणाऱ्या आरोपीवर पोलीस कारवाई काय करणार याकडे, नागरिकांचे आता लक्ष लागला आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत असतानाच अनेक तरुण रिल्सच्या माध्यमातूनही दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS