Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औटेवाडी-खेड रस्त्याची दुरवस्था

कासवगती कामामुळे ग्रामस्थांची डोकेदुखी

कर्जत : कर्जत तालुक्यातील औटेवाडी- खेड या रस्त्याच्या मागणीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलन आणि रास्ता रोकोसह विविध आंदोलने झाली, मात्र प्रश्‍न सुटलेला

राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे : शरद पवार l DAINIK LOKMNTHAN
’शुक्र तीर्थ’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात
शिंदेशाहीचे नवे राज्य, मात्र राज्यकर्ते जुनेच

कर्जत : कर्जत तालुक्यातील औटेवाडी- खेड या रस्त्याच्या मागणीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलन आणि रास्ता रोकोसह विविध आंदोलने झाली, मात्र प्रश्‍न सुटलेला नाही. विरोधात असणारी नेते मंडळी रस्त्यासाठी आवाज उठवतात परंतु तेच नेते सत्तेत गेल्यावर तेरी भी चूप आणि मेरी भी चूप अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा त्रास मात्र ग्रामस्थांना बसत आहे.
रस्त्याची अवस्था बिकट असल्यामुळे उपचाराअभावी अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. विद्यार्थांना शाळेत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात हा रस्ता चालण्यायोग्य राहत नाही त्यामुळे सुमारे 1 हजार लोकसंख्येचे गाव मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. या भागातील नागरिकांना खडबडीत रस्त्यावरून खेड येथील मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. औटेवाडी-खेड हा रस्ता आ. रोहित पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 4 किमी रस्ता मंजुर केला म्हणून औटेवाडी ग्रामस्थांमधे आनंदाचे वातावरण होते. मात्र ठेकेदाराकडून संथ गतीने काम केले जात असल्याने लोक त्रस्त आहेत.
.

COMMENTS