Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व:वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कारनी बाबु कोकाट सन्मानित

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील त्रिंबक (बाबु) कोकाट यांना राज्यस्तरीय स्व:वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार 2023 या पुर

पवारवाडीतील हिंदूवर ढवळेवाडीच्या स्मशानभूमीत अंत्यविधी; मुस्लिमांवर आसू येथे अंत्यविधी
राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा, जामीन मंजूर
बाबरी, गोध्रा संबंधित सर्व खटले होणार बंद :सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील त्रिंबक (बाबु) कोकाट यांना राज्यस्तरीय स्व:वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार 2023 या पुरस्काराने दि.2जुलै रोजी नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथे भव्य अश्या मोठ्या कार्यक्रम सोहळा मध्ये विभागीय कृषी सहसंचालक श्री.मोहन वाघ, श्री.प्रमोद रसाळ, अधिष्ठाता व शिक्षण संचालक चझघत,राहुरी, मा.श्री दिपक शिर्के , सुप्रसिद्ध अभिनेता, मा.श्री.राजेंद्र देवरे , चेअरमन, महाक्रश कक्लस्टर प्रा कं.लि.श्री.भूषण निकम, चेअरमन अग्रो केअर ग्रूप ऑफ कंपनीज, व कृषि विभाग मधील अधिकारी प्रमुख मान्यवरांचा हस्ते या बाबु कोकाट यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल व विशेष सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिक येथील प्रसिद्ध ग्रो केअर कृषिमंच या नावाजलेल्या संस्थेमार्फत दर वर्षी एक जुलै रोजी कृषि दिनानिमित्त महाराष्ट्रातील 20 मान्यवरांना कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना हा पुरस्कार कृषि दिनानिमित्त देण्यात येतो ठाकर आडगाव येथील संध्या मल्टी सर्व्हिसेस चे संचालक व युवा शेतकरी मित्र बाबु कोकाट यांनी संध्या मल्टी सर्व्हिसेस च्या माध्यमातून गेल्या चार ते पाच वर्षांत शेतकरी हिताचे प्रामाणिक पणे कामे केल्यामुळे त्यांना या कामाची पावती म्हणून हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला बाबु कोकाट यांना हा पुरस्कारनी सन्मान झाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्ष होत आहे.

COMMENTS