Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबूजींनी पाथर्डी तालुक्यात शिक्षणाची गंगोत्री आणली ः अविनाश मंत्री

पाथर्डी/प्रतिनिधी ः पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार व थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. बाबुजी आव्हाड यांनी दूरदृष्टी ठेऊन पाथर्डी तालुक्यात शिक्षणाची गंग

काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा 100 टक्के निकाल
अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
अहमदनगर : शहरातील रस्त्यांसाठी ३५० कोटींचा निधी द्या.. मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पाथर्डी/प्रतिनिधी ः पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार व थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. बाबुजी आव्हाड यांनी दूरदृष्टी ठेऊन पाथर्डी तालुक्यात शिक्षणाची गंगोत्री आणली. बाबूजींचे चरित्र, चारित्र्य आणि कर्तुत्व खूप मोठे होते. आपले ज्ञान व्यक्त कसे करायचे हे बाबुजींनी शिकविले. बाबुजी हे विलक्षण प्रतिभा आणि सकारात्मक दृष्टीकोन असणारे पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते होते. बाबुजींच्या कर्तुत्वाचे स्मरण करून त्यांचे विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन अविनाश मंत्री यांनी केले.
ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्य सेनानी, मा. आमदार स्व. बाबुजी आव्हाड यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन तसेच संगीत व कला क्षेत्रातील कलाकारांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, प्रा. रमेश मोरगावकर, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, विश्‍वस्थ बाळासाहेब कचरे, डॉ. शंकर चव्हाण, दिलीप गर्जे, अरविंद पारगावकर, दादाभाई चौधरी, हुमायून आतार, कैलास दौंड, विलासकाका रोडी, भागीनाथ बडे, सुरेशराव मिसाळ, विवेकानंद विद्या मंदिरचे मुख्याध्यापक शरद मेढे आदी उपस्थित होते. तसेच रमेश मोरगावकर यांनी यावेळी बाबुजींच्या स्मृतींना उजाळा दिला.बाबुजींनी पाथर्डीच्या 25 एकर माळरानावर पार्थ विद्या प्रसारक मंडळाअंतर्गत सन 1966 मध्ये जनता महाविद्यालयाची स्थापना केली. उसतोडणी कामगारांच्या मुलांना उच्चशिक्षण मिळावे हा उदात्त हेतू ठेऊन त्यांनी वर्गणी गोळा करून जिल्ह्यातील तिसरे महाविद्यालय पाथर्डीत सुरु केले. नॅक समिती भेटीप्रसंगी समिती सदस्यांनी बाबुजींचा उल्लेख महामानव असा केला याचा आवर्जून उल्लेख त्यांनी शेवटी केला. यावेळी पाथर्डी शहरातील संगीत व कला क्षेत्रातील कलाकारांचा गीतगायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तसेच या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या कलाकारांचा सत्कार पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आला. दादाभाई चौधरी, हुमायून आतार, कैलास दौंड तसेच नॅशनल गेम्स मास्टर वेटलिफ्टिंग व पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पदक मिळविल्याबद्दल प्रा. विजय देशमुख व राजेंद्र सोनावणे सर यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी हंडाळवाडी येथून पायी प्रवास करून शहरात शिक्षणासाठी येणार्‍या 15 गुणवंत व होतकरू विद्यार्थीनीना सायकल वाटप करण्यात आले. डॉ. वैशाली आहेर यांनी वाचनकट्टा उपक्रमांतर्गत राबविलेल्या भित्तीपत्रक प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन डॉ अजयकुमार पालवे यांनी यावेळी गार्डन अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी स्टील बाकडे भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, सुत्रसंचालन डॉ. बबन चौरे व डॉ. अशोक कानडे तर आभार प्रा. मन्सूर शेख यांनी मानले.

COMMENTS