बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन ; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन ; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

पुणे : पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज 15 नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्यासह 308 श्‍वापदांची नोंद
पुण्यात सीएनजी महागला
श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार हा जीवनातील सर्वोच्च आनंद

पुणे : पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज 15 नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शासनाच्यावतीने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, खासदार गिरीष बापट, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सहपोलिस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सहायक संचालक सुनीता आसवले यांनीही स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच खासदार अरविंद सावंत, पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनिता वाडेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण शासकीय इतमामात स्व. पुरंदरे यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर तिरंगा लपेटल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे सुपुत्र अमृत पुरंदरे आणि प्रसाद पुरंदरे यांच्या ताब्यात राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला. स्वर्गीय पुरंदरे यांना श्रद्धांजली देण्यासाठी कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के आदी अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS