Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 बाबासाहेब कवाद निघोज पतसंस्था सभासदांना देणार १२ टक्के लाभांश- श्री वसंत कवाद

निघोज प्रतिनिधी - बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मा श्री.वसंत बाबासाहेब कवाद यांच्या अ

ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्र अहमदनगर जिल्ह्यात प्रथम
आम्ही श्रेयवादाचे नव्हे तर विकासाचे राजकारण करतो ः मा.आ. कोल्हे
सामाजिक न्यायचे तत्व आत्मसात केल्या शिवाय डॉ आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही- अँड.नितीन पोळ

निघोज प्रतिनिधी – बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मा श्री.वसंत बाबासाहेब कवाद यांच्या अध्यक्षतेखाली पुष्कर लॉन्स, निघोज येथे संपन्न झाली . सभेला सुरुवात होणाच्याअगोदर लक्ष्मी मातेचे व स्वर्गीय श्री बाबासाहेब कवाद यांच्या प्रतिमेचे पुजन  कन्हैया उद्योग समुहाचे अध्यक्ष मा . श्री . शांताराम मामा लंके यांचे हस्ते करण्यात आले .  त्यानंतर दिप प्रज्वलन  संस्थेचेअध्यक्ष श्री वसंत कवाद , व्हा. चेअरमन श्री नामदेव थोरात , संचालक श्री चंद्रकांत लामखडे , श्री. बाळासाहेब लामखडे , श्री . दामूशेठ लंके, श्री. सुनिल मेसे  , सोमनाथ वरखडे ,  यांच्या हस्ते करण्यात आले . अहवाल सालात दिवंगत झालेले संस्थेचे  सभासद , ठेवीदार ,हितचिंतक यांना  श्रध्दांजली अर्पण करण्यात आली . त्यानंतर सभेला सुरुवात करुन  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . दत्तात्रय लंके यांनी मागील २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयाचे वाचन केले . या सभेच्या अजेंठा वरती असणारे सर्व विषय एक मताने मंजुर करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. श्री वसंत कवाद यांनी दि . ३१ / ०३ / २०२४ अखेरच्या संचालक मंडळाने सादर केलेल्या वार्षिक ताळेबंद व नफा -तोटा अहवालाचे वाचन केले . यावेळी संस्थेच्या ठेवीमध्ये ३१ / ०३ / २o२४नंतर साडेपाच महिन्यात संस्थेच्या ठेवीमध्ये ३१कोटी ४४ लाखाची वाढ होऊन संस्थेच्या १४/ ०९ /२०२३अखेर संस्थेच्या २५३ कोटी ८८ लाख ठेवी झालेल्या आहे . संस्थेचे कर्जवाटप  १५६ कोटी ४८लाख , गुंतवणूक १४५ कोटी ८८ लाख,  मालमत्ता ५ कोटी ०५ लाख, निधी ३३कोटी ५१लाख आहे . संस्थेला ३१ / ०३ / २०२४ अखेर ४ कोटी ७२ लाखाचा  नफा झालेला आहे .  संस्थेची थकबाकी  ३ .७२ टक्के असून नेट एनपीए ० .०० टक्के आहे .सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचे  अध्यक्षांनी यावेळी जाहीर केले .  संस्थेमार्फत  शैक्षणिक, धार्मिक , सामाजिक, सांस्कृतिक कार्यात संस्थेने भरीव अशी मदत केलेली आहे . या वर्षीपासून आपल्या संस्थेमार्फत सभासद ,खातेदार व नातेवाईक यांचेसाठी मोफत हॉस्पीटल बेड देण्याचे चालू केलेले आहे . संस्थेने सभासद,खातेदार यांच्यासाठी संस्थेने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान , नवनवीन योजना, बँकीग सुविधा याचा अवलंब करीत असल्याने  सन २०२८पर्यंत  संस्थेचा१ हजार कोटी पर्यंत व्यवसायामध्ये वाढ करण्याचा मानस आहे .त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्री वसंत कवाद यांनी सांगीतले की ठेवीचे व्याजदर कमी न करता सलग तीन वर्षापासून कर्जाचे १टक्के नी व्याजदर कमी करून सोने तारण कर्ज ९ टक्के व इतर कर्ज ११ टक्के व्याज दराने आपण देत आहोत . बॅकेच्या बरोबरीने आपण कर्जदार सभासदांना कर्ज देत असून ज्या सभासदांना कर्जाची आवश्यकता असेल अशा सभासदांनी  आपल्या व्यवसायासाठी , इतर उद्योगधंद्यासाठी , आपल्या पतसंस्थेकडून कर्ज घेण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांनी केले. 

 यावेळी संस्थेचे सभासद  श्री सोमनाथ वरखडे , श्री . रामचंद्र सुपेकर सर ,महात्मा फुले पतसंस्थेचे अध्यक्ष श्री सोपानराव भाकरे, श्री . रूपेश ढवण, श्री .भास्कर कवाद, इत्यादी मान्यवरांनी   संस्थेचे सभासद ,खातेदार ,यांना दिलेल्या बँकीग सुविधाच्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून संस्थेचे चेअरमन , व्हा . चेअरमन , संचालक मंडळ , मुख्य कार्यकारी आधिकारी, व कर्मचारी वृंद यांचे त्यांनी आभिनंदन केले . संस्था करीत असलेल्या चांगल्या कामाबद्दल सर्वांनी शुभेच्छा दिल्या .

 या वेळी संस्थेचे व्हा .चेअरमन श्री नामदेव थोरात, संचालक श्री . चंद्रकांत लामखडे , श्री बाळासाहेब लामखडे ,श्री .दामुशेठ लंके, श्री भिवाशेठ रसाळ, श्री शांताराम कळसकर , श्री  सुनिल मेसे , श्री .बाबाजी कळसकर , श्री . बाळशिराम डेरे , श्री .अभिजित मासळकर , श्री .सतीष साळवे , श्री दिलीप सोदक ,संचालिका सौ लताबाई कवाद , सौ. वैशाली कवाद उपस्थित होते . 

तसेच संस्थेचे सभासद माजी सरपंच राजाराम कवाद, ठकाराम लंके निघोज परिसर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अमृता शेठ रसाळ, संचालक रामदास शेठ वरखडे , निघोज वि.का .सेवा सोसायटीचे चेअरमन सुनिल वराळ , व्हा . चेअरमन शांताराम लाळगे , संचालक वसंत ढवण, अस्लिम हावलदार ,  ग्रामपंचायत सदस्य गणेश कवाद ,दिगांबर लाळगे, मळगंगा विकास ट्रस्टचे विश्वस्त ज्ञानेश्वर लामखडे , रोहीदास लामखडे, ज्ञानेश्वर लंके, रामदास ससाणे , विश्वास शेटे  ,संदीप वराळ ,रमेश ढवळे ,मंगेश लंके ,पत्रकार दत्तात्रय उनवणे , सुरेश खोसे ,भास्कर कवाद , विजय भुकन, न्यू इग्लिश मेडीअम  स्कुल च्या व्यवस्थापिका सौ . संगिता कवाद , चंद्रकांत लंके, खंडू लामखडे ,  शिवाजी लामखडे ,दिलीप कवाद, किसन कवाद,  शिवाजी लामखडे , ज्ञानदेव भांबरे,संतोष पंदारे, अविनाश भाकरे , संदीप रसाळ  ,  बबन  तनपुरे  , ज्ञानदेव भांबरे  , दिलीप ढवण , शिवाजी लंके ,प्रशांत लोळगे , बन्सी गुंड गुरूजी ,रविंद्र रसाळ , निवृत्ती तनपुरे, रविंद्र पवार , विश्वास शेटे बाबाजी लंके , कुशाभाऊ आवटे ,इत्यादी मान्यवर सभासद व संस्थेचे अधिकारी कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री बाळासाहेब लामखडे यांनी केले तर आभार शांताराम कळसकर यांनी मानले .

COMMENTS