Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबासाहेब कवाद पतसंस्था देणार 12 टक्के लाभांश

चेअरमन वसंत कवाद यांची माहिती

निघोज ः बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन वसंत बाबासाहेब कवाद यांच्या अध्यक्षतेखाली पुष्क

सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवा : अजित पवार l DAINIK LOKMNTHAN
प्रवरेच्या कृषीदुतांचे पिंपळवाडीत स्वागत
राहाता सहकारी पतसंस्थेने सभासदांना केले 15 टक्के लाभांश वाटप

निघोज ः बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन वसंत बाबासाहेब कवाद यांच्या अध्यक्षतेखाली पुष्कर लॉन्स, निघोज येथे संपन्न झाली. या सभेत सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याची घोषणा संस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांनी केली.
सभेला सुरुवात होणाच्याअगोदर लक्ष्मी मातेचे व स्वर्गीय बाबासाहेब कवाद यांच्या प्रतिमेचे पूजन कन्हैया उद्योग समुहाचे अध्यक्ष शांताराम मामा लंके यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर दिप प्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, व्हा.चेअरमन नामदेव थोरात, संचालक चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, दामूशेठ लंके, सुनिल मेसे, सोमनाथ वरखडे यांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल सालात दिवंगत झालेले संस्थेचे  सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेला सुरुवात करुन  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके यांनी मागील 27 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयाचे वाचन केले. संस्थेच्या ठेवीमध्ये 31 मार्च 2024 नंतर साडेपाच महिन्यात संस्थेच्या ठेवीमध्ये 31 कोटी 44 लाखाची वाढ होऊन संस्थेच्या 14 सप्टेंबर 2023 अखेर संस्थेच्या 253 कोटी 88 लाख ठेवी झालेल्या आहेत. संस्थेचे कर्जवाटप 156 कोटी 48 लाख, गुंतवणूक 145 कोटी 88 लाख,  मालमत्ता 5 कोटी 05 लाख, निधी 33 कोटी 51लाख आहे. संस्थेला 31 मार्च 2024 अखेर 4 कोटी 72 लाखाचा नफा झालेला आहे.  संस्थेची थकबाकी 3.72 टक्के असून नेट एनपीए 0.00 टक्के आहे. सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याचे अध्यक्षांनी यावेळी जाहीर केले.  संस्थेमार्फत  शैक्षणिक, धार्मिक , सामाजिक, सांस्कृतिक कार्यात संस्थेने भरीव अशी मदत केलेली आहे. या वर्षीपासून आपल्या संस्थेमार्फत सभासदयावेळी संस्थेचे सभासद सोमनाथ वरखडे, रामचंद्र सुपेकर, महात्मा फुले पतसंस्थेचे अध्यक्ष सोपानराव भाकरे, रूपेश ढवण, भास्कर कवाद, इत्यादी मान्यवरांनी  संस्थेचे सभासद, खातेदार यांना दिलेल्या बँकीग सुविधाच्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून संस्थेचे चेअरमन, व्हा . चेअरमन , संचालक मंडळ , मुख्य कार्यकारी आधिकारी, व कर्मचारी वृंद यांचे त्यांनी आभिनंदन केले.

COMMENTS