नाशिक : शिवसेनेचे उपनेते व 25 वर्ष आमदार राहिलेले बबनराव तथा नाना घोलप यांनी अखेर गुरूवारी सकाळी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेनाला (ठ

नाशिक : शिवसेनेचे उपनेते व 25 वर्ष आमदार राहिलेले बबनराव तथा नाना घोलप यांनी अखेर गुरूवारी सकाळी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेनाला (ठाकरे गट) जय महाराष्ट्र केला. गेल्या अनेक दिवसापासून घोलप हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मात्र अद्याप त्यांनी कुठल्या पक्षात जाणार हे जाहीर केलेले नाही. बबनराव घोलप यांनी सांगितले की, मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मी निष्ठेने व ईमाने ईतबारे काम केले आहे. मला पक्षाने जे जे सांगितले, ते प्रामाणीकपणे केले असल्याचे घोलप यांनी म्हटले आहे.
COMMENTS