Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बी.एड. परीक्षेत शंभर टक्के निकाल

श्रीरामपूर : येथील रयत शिक्षण संस्थेच्या स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा बी.एड. परीक्षेत शंभर टक्के निकाल लागले असल्याची माहिती

अधिकारवाणीने आपली कामे सांगा ः खा. निलेश लंके
कर्जतच्या सदगुरु कन्या विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार
कोपरगावात डॉ. आंबेडकरांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

श्रीरामपूर : येथील रयत शिक्षण संस्थेच्या स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा बी.एड. परीक्षेत शंभर टक्के निकाल लागले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. मुकुंद पोधे यांनी दिली. येथील रयत शिक्षण संस्थेच्या स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बी.एड. परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे. पुणे विद्यापीठाचा बी. एड. परीक्षेचा एकूण निकाल 95.53 टक्के असून महाविद्यालयाचा निकाल  100 टक्के लागलेला आहे. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणी पासून ते ओ ग्रेड विशेष प्राविण्य श्रेणीसह उत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये वर्षा दत्तात्रय भवार हिने 84.80 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक,श्रद्धा चंद्रकांत चित्ते 81.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर नीना अशोक आढाव हिने 81.10 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. या सर्व  विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषद सदस्या तथा रयत शैक्षणिक संकुल श्रीरामपूरच्या चेअरमन मीनाताई जगधने, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. चंद्रकांत भोये, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS