Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात आता कुर्‍हाड गँगची दहशत

पुणे/प्रतिनिधी ःपुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वारंवार समोर येत असून, गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुणे सतत चर्चेत येत आहेत. दोन दिवसांपूर्वी तरुणीव

‘घे डबल’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
रोहित विकास मध्ये जबरदस्त हाणामारी Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता
जर ही दारू नाही तर ती आपल्या नातवाला पाजाल का ? |

पुणे/प्रतिनिधी ःपुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वारंवार समोर येत असून, गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुणे सतत चर्चेत येत आहेत. दोन दिवसांपूर्वी तरुणीवर कोयत्याने हल्ल्याने झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा धक्कादायक घटना घडली आहे. कोयता गँगनंतर आता पुण्यामध्ये कुर्‍हाड गँगची दहशत पसरली आहे. पुण्यामध्ये कुर्‍हाडीने दुकानाची तोडफोड केली आहे. पुण्याच्या शेवाळेवाडीमध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये मिठाईच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा दहशत पसरली आहे.
 मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शेवाळेवाडी परिसरात असलेल्या मिठाईच्या दुकानात कुर्‍हाडीने तोडफोड करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमार ही घटना घडली. तिघांनी मिठाईच्या दुकानामध्ये तोडफोड केली. या दुकानातील काचा कुर्‍हाडीने फोडल्या असून मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींपैकी एका विधीसंघर्षीत मुलाला ताब्यात घेतले आहे. तर इतर दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी पावणे सात वाजताच्या सुमारास 3 जणांनी शेवाळेवाडी फाटा येथील चैतन्य स्वीट अँड सेंटरमध्ये घुसून त्यांनी दुकानातील सर्व काचेची कपाटे आणि फ्रिजची लोखंडी कुर्‍हाडीने तोडफोड केली. ड्युटीवर असलेले पोलिस शिपाई विजयकुमार ढाकणे यावेळी शेवाळवाडी चौक येथे आले असतांना ही घटना घडत होती. त्यांनी दुचाकीवरुन पळून जाणार्‍या आरोपींचा पाठलाग केला. जवळपास सहा किलोमीटरपर्यंत पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर आरोपींची दुचाकी घसरली आणि ते खाली पडले. त्यानंतर यामधील दोन जण पळून गेले. तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी हडपसर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण आहे.

COMMENTS