Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘सत्यप्रेम की कथा’ चा जबरदस्त टीझर रिलीज

 बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सत्य प्रेम की कथा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ए. आर रहमान यांचा कार्यक्रम पुणे पोलिसांनी केला बंद
काश्मीरमध्ये कर्नलसह 3 जवानांना वीरमरण
बेंगळुरू टेक फर्मच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकाची माजी कर्मचाऱ्याकडून हत्या

 बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सत्य प्रेम की कथा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत दोघांचेही चाहते खूपच उत्सुक आहेत. अशामध्ये या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. रोमांस आणि ड्रामाने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. कियाराने या चित्रपटाचा टीझर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये कार्तिक-कियाराची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट यावर्षी 29 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात कार्तिक आर्यनच्या दमदार डायलॉगने होते. हा टीझर पाहता ही एक हृदयस्पर्शी लव्हस्टोरी असल्याचे दिसत आहे. दोघांचाही या टीझरमध्ये जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियारासोबत गजराज राव आणि सुप्रिया पाठकही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

COMMENTS