मराठमोळी चंद्रा- चंद्रमुखीची जबरदस्त जुगलबंदी

Homeताज्या बातम्यामनोरंजन

मराठमोळी चंद्रा- चंद्रमुखीची जबरदस्त जुगलबंदी

 माधुरी-अमृताचा व्हिडिओ व्हायरल

'झलक दिखला जा' हा प्रसिद्ध शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे.तब्बल ५ वर्षांनतर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा या शोचा १० वा सीझन लवकर

‘दिल की धडकन’ माधुरी दीक्षित पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत
माधुरी दिक्षीत लोकसभेच्या रिंगणात ?
माधुरी दिक्षीत, उज्ज्वल निकम भाजपकडून लढणार लोकसभा

‘झलक दिखला जा’ हा प्रसिद्ध शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे.तब्बल ५ वर्षांनतर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा या शोचा १० वा सीझन लवकरच प्रसारित होणार आहे. या शोची घोषणा केल्यापासून निर्माते या शोचे जोरदार प्रोमोशन करत आहेत. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी कलाकार दिसणार असून मराठी चित्रपटसृष्टीची लाडकी चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकर(Amrita Khanwilkar) देखील या शोमध्ये मराठमोळा जलवा दाखवताना दिसणार आहे. विशेष म्हणजे अमृताने या शोसाठी एक खास प्रोमो शूट केला असून, त्यात नृत्य अप्सरा माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) सोबत जुगलबंदी करताना दिसली आहे. या दोघींचा हा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

COMMENTS