Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोककलेच्या माध्यमातून पाटण तालुक्यात कला पथकाद्वारे विकास कामांचा जागर

सातारा / प्रतिनिधी : राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना सोप्या भाषेत व्हावी, यासाठी ज

कार्यालय ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस चे आज ठिय्या आंदोलन
मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान : जिल्हाधिकारी अमोल येडगे
काही लोकांना काहीही न करता उद्घाटनाची हौस : आ जयंत पाटील

सातारा / प्रतिनिधी : राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना सोप्या भाषेत व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने त्रिरत्न सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था कला पथकाने पाटण तालुक्यातील पाटण, मरळी, मोरगिरी व कोयनानगरमध्ये जनजागृती करण्यात आली.
लोकांसाठी योजना सोप्या, सहज आणि लोकांच्या भाषेत सांगितल्या की, त्या लोकांपर्यत लवकर पोहोचतात. म्हणूनच या पारंपरिक माध्यमाचा उपयोग ग्रामीण भागापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील 63 गावांमध्ये लोककला पथकांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत.
लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत, असा या मोहिमेचा उद्देश आहे. याचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS