Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध धंदे करणार्‍यांच्या मुसक्या आवळा, अन्यथा शहरात गँगवार होतील

काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून होणार्‍या हत्यांमुळे नागरिक भयभीत आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे की नाही अस

प्रदीप मकासरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
सनी लिओनीचा न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर| फिल्मी मसाला | LokNews24 |
मंत्री टोपे व डॉ. पोखरणा यांच्यावर गुन्हे दाखल करा : प्रवीण दरेकर | DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून होणार्‍या हत्यांमुळे नागरिक भयभीत आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे की नाही असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. नगर शहराचा बिहार झाला आहे. अवैध धंद्यांच्या प्रकरणातूनच सदर हत्याकांड झाले आहे. असे असतानाही आजही राजरोसपणे शहरात अवैध धंदे सुरू आहेत. हे धंदे करणार्‍यांच्या मुसक्या तात्काळ आवळा, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने दिला आहे. काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा केली. यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, मनसुख संचेती, उपस्थित होते.
काळे म्हणाले, अवैध धंद्यांच्या तक्रारी वरून हत्याकांड घडल्याची फिर्याद आहे. सखोल तपासातून या मागील विविध कंगोरे समोर येतील. राजकीय वरदहस्तातून गुन्हेगारी, राजरोसपणे अवैध धंदे करणार्‍यांना पोलिसांचा धाक वाटू नये ही पोलीस प्रशासनाला अंतर्मुख करायला लावणारी गंभीर बाब आहे. हृदयद्रावक हत्याकांड घडून देखील बिंगो, मटका, जुगार, सट्टा, सोरट यासह सर्व अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. धंद्यांना राजकीय पाठबळ आहे. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम गरजेची आहे. अन्यथा शहरामध्ये पूर्वी मुंबईत घडायचे तसे गँगवॉर होतील. राजकीय वरदहस्तातून अनेकांचे मुडदे पडतील. यातून शहराला काळीमा फासण्याचे काम होत आहे. मात्र यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. गुन्हेगारीतून तरुणाईने नेका कोणता आदर्श राजकीय व्यवस्था व गुन्हेगारी जगताकडून घ्यावा? दाऊद इब्राहिम, छोटा राजन, मन्या सुर्वे पासून ते शहरातील हत्याकांड करणारे आरोपी हे तरुणाई समोर आदर्श म्हणून पुढे येणार असतील तर अहमदनगरचे भवितव्य अंध:कारमय असल्याची चिंता काळेंनी यावेळी व्यक्त केली. कोतवाली, तोफखाना, भिंगार व एमआयडीसी हद्दीतील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावेत. छापेारी करत गुन्हे दाखल करावेत. दोन पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत अशा गुन्हेगारांना राजकीय हस्तक्षेप झूगारून तात्काळ हद्दपार करावे. एमपीडीए, मोक्का अंतर्गत कारवाया कराव्यात. हत्याकांड, दहशत, गुन्हेगारी, अवैध धंदे, मनपातील भ्रष्टाचार, रस्त्यांचा महाघोटाळा या विरुद्ध काँग्रेस सातत्याने जनहितासाठी आवाज उठवत आहे. काँग्रेसचा जनहितार्थ असणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. दाखल गुन्ह्यांचा सखोल तपास करत संबंधित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

COMMENTS