Homeताज्या बातम्यामनोरंजन

ॲव्हेंजर्स एंडगेम अभिनेता जेरेमी रेनर यांचा अपघात

अमेरिका - मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा सुपरहिरो हॉकीची भूमिका साकारणारा अभिनेता जेरेमी रेनरबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता अपघाताचा बळी

गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात संजीवनी युवा प्रतिष्ठानची वैद्यकीय सेवा
बंगालमध्ये वाघिणीचीच डरकाळी ; पुद्दुचेरी, आसाममध्ये भाजप, केरळात डावे; तमिळनाडूत द्रमुक
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींब्या देण्यासाठी पाथर्डीत लोकशाही मार्गाने बैठा सत्याग्रह

अमेरिका – मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा सुपरहिरो हॉकीची भूमिका साकारणारा अभिनेता जेरेमी रेनरबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता अपघाताचा बळी ठरला, त्यानंतर त्याला तातडीने एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार जेरेमीची प्रकृती ‘गंभीर पण स्थिर’ असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रचंड बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे त्यांच्यासोबत हा अपघात झाला. ऑस्कर-नामांकित अभिनेता जेरेमी रेनरला रविवारी एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले की अभिनेत्यावर सर्वोत्तम उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पण ते स्थिर आहेत. त्यांचे कुटुंब आता त्यांच्यासोबत आहे आणि त्यांची चांगली काळजी घेतली जात आहे. नवीन वर्षाच्या दिवशी बर्फाचे वादळ होते ज्यानंतर अभिनेता पडलेला बर्फ साफ करत होते. यादरम्यान त्याच्यासोबत अपघात झाला आणि तो जखमी झाला. यानंतर त्यांना तात्काळ विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुसळधार बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर बर्फ साचल्याने वाहनांची ये-जा करणे कठीण झाले होते.

COMMENTS