कोपरगाव तालुका ः पृथ्वीतलावरील दृष्ट प्रवृत्तीचा संहार व भक्ताच्या रक्षणार्थ मानव कल्याणासाठी भगवान नृसिंह अवतार परमात्म्याने धारण केला आहे असे प
कोपरगाव तालुका ः पृथ्वीतलावरील दृष्ट प्रवृत्तीचा संहार व भक्ताच्या रक्षणार्थ मानव कल्याणासाठी भगवान नृसिंह अवतार परमात्म्याने धारण केला आहे असे प्रतिपादन साई कथाकार ह भ प बाळकृष्ण सुराशे महाराज यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे नृसिंह जयंती निमित्ताने आयोजित जप अनुष्ठान व हरिनाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की गौतमी गोदावरीच्या तीरावर वसलेले कान्हेगाव येथील नृसिंह मंदिर हे पुरातन स्थान आहे व नगर जिल्ह्यातील एकमेव मंदिर आहे भगवंताचा हा नृसिंह अवतार चिंतनीय आहे ज्या ज्या वेळेस मानवाचे जीवन धोक्यात येते त्या त्या वेळेस ईश्वर अशाही अवतारात प्रगट होऊन सज्जनांचे रक्षण करीत असतो नृसिंह दर्शनाने मनुष्य जीव निर्भर होऊन त्याचा आत्मविश्वास बळावतो मानसिक मनोधैर्य गमावलेल्या मनुष्याने भगवान नृसिंहाची सेवा केल्यास विशेष लाभ होतो असेही त्यांनी त्यांच्या कीर्तनातून सांगितले प्रतिवर्षी कान्हेगाव येथे नृसिंह नवरात्र साजरे होत असते यावर्षी जप अनुष्ठान व नाम सप्ताह नृसिंह पुराण ,कीर्तन, प्रवचने असा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात कान्हेगाव ग्रामस्थ साजरा करीत आहे दररोज महाप्रसादाचे आयोजन असून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत
COMMENTS