पाथर्डी ः औद्योगिक क्षेत्रातील सेवानिवृत्त कामगारांची राज्य व केंद्र सरकारकडून आर्थिक अवहेलना सुरू आहे.या प्रश्नांवर आपण मविआ खासदारांशी चर्चा क
पाथर्डी ः औद्योगिक क्षेत्रातील सेवानिवृत्त कामगारांची राज्य व केंद्र सरकारकडून आर्थिक अवहेलना सुरू आहे.या प्रश्नांवर आपण मविआ खासदारांशी चर्चा करून येत्या अधिवेशनात संसदेसमोर धरणे आंदोलन करून सरकारचे याकडे लक्ष वेधू असे आश्वासन खासदार निलेश लंके यांनी दिले.ते शहरातील संस्कार भवन येथे सेवानिवृत्त कामगार संघटनेच्या वतीने पेन्शनर मेळावा आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत, हौसराव राजळे, सुभाष पोखरकर संपत समीकर अंजली वाघ माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, दिगंबर गाडे, ठाकरे सेनेचे रफिक शेख आदी उपस्थित होते. खासदार लंके म्हणाले वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी या लढ्याला आपला सक्रिय पाठिंबा नेहमी राहील. या घटकाच्या समस्यांबाबत खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे यांनी मागील अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले त्यावेळी वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले मात्र ते अद्यापही पूर्ण झालेले नाही या घटकाचा सदस्य म्हणून या क्षेत्रातील कामगारांची व्यथा काय असते हे मी जाणून आहे त्यामुळे येथे अधिवेशनात मविआच्या राज्यातील खासदारांसोबत चर्चा करून संसदेसमोर धरणे आंदोलन करू. यावेळी बोलताना प्रताप ढाकणे म्हणाले की, निवृत्तीवेतन तूटपूनजे असल्याने या घटकाची सरकारकडून क्रूर चेष्टा सुरू आहे आयुष्यभर सेवा देऊनही औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना योग्य निवृत्तीवेतन मिळत नसल्याने त्यांचा आत्मसन्मान खचतो आहे या विषयावर देशभरात व्यापक चर्चा व्हायला आवश्यक आहे हजार पाचशे रुपयांचे निवृत्तीवेतन देऊन सरकार कामगारांच्या तोंडाला पाणी पुसत आहे या क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच त्यांना पाठबळ देत राहू असे ढाकणे शेवटी म्हणाले सूत्रसंचालन सुखदेव मर्दाने यांनी केले.
COMMENTS