Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात सहभागी व्हा

समता परिषद, सावता परिषदेसह विविध ओबीसी संघटनांचे आवाहन

श्रीगोंदा शहर ः अहमदनगर शहरात शनिवारी 3 फेबु्रवारी रोजी ओबीसी-भटके विमुक्त महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेसाठी ओबीसी, भटक्या विमुक

बिबट्यांच्या नसबंदीला परवानगी द्या
राहुरी तालुका शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी घाडगे तर उपाध्यक्षपदी आरगडे
संपावरील शिक्षकांनी भरलेल्या चार शाळा दिल्या चक्क सोडून…

श्रीगोंदा शहर ः अहमदनगर शहरात शनिवारी 3 फेबु्रवारी रोजी ओबीसी-भटके विमुक्त महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेसाठी ओबीसी, भटक्या विमुक्त समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सावता परीषद, मुस्लिम बांधव, ओबीसी समाजाचे प्रतिनिधी, भटके-विमुक्त समाजाचे पदाधिकारी आणि बहुजन समाजाचे कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आले आहे.
श्रीगोंद्यात शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून आवाहन करण्यात आले आहे. यावेळभ गोरख आळेकर यांनी म्हटले की, 3 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या महा एल्गार मेळाव्याला हजर राहण्यासाठी विवीध संघटनाच्या पदाधिकार्‍यांनी रात्र दिवस समाज बांधवांच्या घरो घरी भेटी घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केल्याचे सांगितले. या सभेसाठी हजोरोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित राहणार असून तालुक्यातील शेडगाव येथून ज्योत प्रज्वलित करून रॅली अहमदनगर च्या दिशेने निघणार आहेत. पुढे सदरील रॅली टाकळी-आढळगाव-श्रीगोंदा शहर-पारगाव-घारगाव-कोळगाव-अरणगाव मार्गे नगर येथे पोहचणार आहे. प्रत्येक गावात शेकडोंच्या संख्येने चारचाकी गाड्या आणि मोटरसायकल सह रॅलीत सहभागी होणारं आहेत. साधरण 2500 वाहनांचा ताफा शिस्तबद्ध पद्धतीनेआंदोलन स्थळी जाणार आहे. मराठा आरक्षणास आमचा विरोध नाही, त्यांना आरक्षण मिळावे परंतु ते ओबीसी आरक्षणास धक्का न लावता स्वतंत्र मिळावे. शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा या महाराष्ट्रात झुंडशाही व दबावतंत्राचा वापर करून सरकारवर दबाव आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत  आंदोलनाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी  ओबीसी बांधवानी कोणत्याही प्रकारच्या दबाव तंत्राला बळी पडू नये. हि महा एल्गार मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे ऋषिकेश शेलार यांनी सांगितले.  या पत्रकार परिषदेत शरद जमदाडे, भाऊसाहेब कोळपे, मुकुंद सोनटक्के, मनीषा काळे, राजुदादा गोरे, ऋषिकेश शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. यावेळी तालुक्यातून उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना आयोजकांनी अभ्यासपूर्ण उत्तर दिली. पत्रकार परिषदेत सुरेश सुपेकर, मुकुंद सोनटक्के, राहूल राऊत, शरद जमदाडे, राजु गोरे, विजय शेंडे, ऋषिकेश शेलार, ओंकार शिंदे, मनीषा काळे, सागर वाकडे, जालिंदर बोडखे, गणेश शिंदे, बंडोपंत कोथंबीरे, संजय डाके, गोरख आळेकर, पांडूशेठ गांजुरे, भाऊसाहेब कोळपे, दस्तगीर इनामदार, सह ओबीसी समाज घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS