Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 गेवराई तहसीलवर 10 जुलै रोजी काढण्यात येणार्‍या संविधान अधिकार मोर्चास उपस्थित रहा – धम्मपाल कांडेकर

गेवराई प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील भूमिहीन, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि वंचित समूहातील शेतमजुरांच्या ताब्यातील गायरान जमिनी व निवासी अतिक्

हिरवाईने कातकरी वस्तीवर फुलवला दीपावलीचा आनंद
रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाला पूर्णविराम
राज्यात एक कोटी सहा लाख टन साखर उत्पादन ; इथेनॉल उत्पादनात महाराष्ट्राचा झेंडा उंच

गेवराई प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील भूमिहीन, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि वंचित समूहातील शेतमजुरांच्या ताब्यातील गायरान जमिनी व निवासी अतिक्रमणे कायम करून त्यांना मालकी हक्क देण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर न्याय मागण्याच्या संदर्भाने गेवराई तहसील कार्यालयावर सोमवार दि.10 जुलै 2023 रोजी संविधान अधिकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चास तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने पँथर प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी केले आहे पॅथर्स प्रदेश प्रवक्ते धम्मपालजी कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुका पद्अधिकारी जोमाने बैठका नियोजन करत आहेत.
या मोर्चामध्ये पुढील प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात येणार असून सदरील मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी संविधान अधिकार मोर्चाचे सोमवार दि.10 जुलै 2023 रोजी आयोजन केले आहे. यामध्ये 1) भूमिहीन कुटुंबाला कोरडवाहू 5 एकर किंवा बागायती अडीच एकर जमीन कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत मिळालीच पाहिजे, 2) भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्यांक व आदिवासींच्या ताब्यातील गायरान जमीन कास्तकारांच्या विनाअट नावे करून त्यांना मालकी हक्क देण्यात यावा, 3) दलित, आदिवासींवरील वाढत्या अत्याचाराला पायबंद घालून महाराष्ट्र शासनाने आरोपीस कठोर शासन करण्याची तरतूद करावी आणि सामूहिक अत्याचार प्रकरणातील संबंधित गावाचा विकास निधी तातडीने बंद करण्यात यावा, 4) भीमनगर गेवराई येथील दलित समाजाच्या मालकी हक्कातील (पीटीआर) असलेल्या घरांना अतिक्रमणे निष्कासित करा म्हणून नोटीसा देणार्‍या संबंधित महसूल अधिकार्‍यांवर अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, 5) शासकीय सेवेतील कंत्राटी पद्धत बंद करून शासकीय सेवेतील रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात, 6) गेवराई शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना मालकी हक्काचे उतारे (पिटीआर) देण्यात यावेत, 7) गेवराई शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिवाजी चौकात आणि पंचायत समिती कॉर्नर, डॉ.आंबेडकर चौकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी आवश्यक त्या गरजेनुसार जागेची तरतूद करण्यात यावी, 8) उपजिल्हा रूग्णालय गेवराई येथे कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी यासह इतर अनेक प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. सदरील मोर्चा सोमवार दि.10 जुलै 2023 रोजी आंबेडकर चौकातून निघून लोकशाही मार्गाने घोषणा देत तहसील कार्यालय गेवराई येथे पोहोचणार आहे. तरी या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने तमाम गोरगरीब जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन संविधान अधिकार मोर्चातील समन्वय समितीच्या वतीने पँथर्स रिपाइंचे म  प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कारके तालुकाध्यक्ष ऊमेश सोनोने बंन्डु कांडेकर भारत तुरुकमारे ऊध्दव भालेराव गणेश उढाण यश प्रधान राहुल भालेराव सिदार्थ वक्ते बप्पा शरणागत बाबा दाभाडे करण कांडेकर यश कांडेकर पाजेद्र कांडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

COMMENTS