Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शोरुम समोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टाळला,

अहमदनगर : कारच्या शो रूम मधुन घेतलेली नवीन कार वारंवार बिघडत असल्याने वैतागलेल्या कार मालकाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प

श्रीगोंद्यात आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन
शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवदुर्गाचा सत्कार
आमदार निलेश लंके यांच्याशी झालेल्या वादानंतर तहसीलदार ज्योती देवरे पहिल्यांदाच बोलल्या…I LOK News24

अहमदनगर : कारच्या शो रूम मधुन घेतलेली नवीन कार वारंवार बिघडत असल्याने वैतागलेल्या कार मालकाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर मनमाड रोड वरील मारूती सुझुकी कंपनीच्या कांकरिया कार शोरुम समोर घडली. नगर मनमाड रोडवरील बोल्हेगाव एमआयडीसी साईबन रोड येथील राहणारे रामचंद्र शंकर अनभुले यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वी नगर मनमाड रोडवरील मारुती सुझुकीच्या कांकरिया शोरूमकडून फोर व्हीलर मारूती कार गाडी विकत घेतली होती. मात्र तीन महिन्यांमध्ये गाडीने अनेक काम काढल्याने वारंवार शोरूम दाखवून देखील गाडीचे काम पूर्ण झाले नाही. अनेक वेळा शोरूमला भेट देऊन त्यांनी गाडीचे इंजिन देखील बदलून दिले, ते बोगस पद्धतीने टाकले मात्र गाडी तरीही काम काढत राहिली अनेक वेळा गाडीचे ब्रेक फेल होणे इंजिन काम काढणे असे विविध काम गाडी काढत असल्यामुळे ती गाडी बदली करून दुसरी गाडी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र त्याला शोरूम प्रशासनाने कोणतीही दाद दिली नसल्यामुळे अखेर रामचंद्र शंकर अनुभुले यांनी कठोर भुमिका घेतली. ब्रेक फेल होऊन दुसऱ्याचा जीव घेण्यापेक्षा स्वतःवरच शोरूमच्या दारामध्ये कार उभी करत गाडीसह स्वतःला संपवून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अनभुले यांनी अंगावर पेट्रोल ने भरलेली बाटली ओतून घेतली परंतु उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांच्या हातातील बाटली ताब्यात घेतली, त्यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे. त्यावेळी पोलीस प्रशासनाने सदर घटनेत मध्यस्थी करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची विनंती केली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. मात्र गाडी मालक रामचंद्र शंकर अनभुले यांनी जोपर्यंत ही गाडी बदलून देत नाहीत तोपर्यंत गाडी शोरूमच्या दारात ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे…

COMMENTS