सोलापूर ः काँगे्रस पक्षाने सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सोलापूरात भाजप विरूद्ध काँगे्रस असा साम
सोलापूर ः काँगे्रस पक्षाने सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सोलापूरात भाजप विरूद्ध काँगे्रस असा सामना रंगणार आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. या आरोपानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण तापले आहे.
लोकसभेची उमेदवारी काँगे्रसकडून पक्की असल्यामुळे काही दिवसांपासून प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यात मतदारांच्या गाठीभेटी घेतांना दिसून येत आहे. त्या पंढरपूर तालुक्याच्या दौर्यावर होत्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभरात लोकप्रतिनिधींना गाव बंद आंदोलन सुरू आहे. गाव बंदी असताना गावात येणार्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचे काम सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रणिती शिंदे म्हणाले की, मी गेल्या अनेक दिवसांपासून सोलापुरातील नागरिकांशी संवाद साधत आहे. परंतु, गुरुवारी सरकोली गावात गेले असता काही लोकांनी माझ्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही गावात मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी आहे. मराठा समाजाने पुकारलेल्या गावाबंदीला समर्थन आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे. परंतु, भाजपची लोक या आंदोलनाचा गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे. ते मराठा आंदोलक नव्हते मराठा आंदोलकाच्या नावाने भाजपचे लोक मराठा समाजाचे आरक्षणाचे आंदोलन बदनाम करत आहेत. गुरुवारी दुपारी पंढरपूर तालुक्यात आल्यानंतर त्यांना मराठा समाजाकडून जाब विचारण्यात आला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या नेत्यांनाही गाव बंदी करावी, अशी मागणी केली होती. त्या सरकोलीतून सोलापूरकडे येत असताना त्यांची गाडी अडवण्यात आली. त्यावेळी आपल्या गाडीवर भाजप समर्थक लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
COMMENTS