Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

काळे झेंडे दाखवणार्‍या कार्यकर्त्यांना अटक

नांदेड / प्रतिनिधी ः मराठवाड्यातल्या हिंगोली येथे ओबीसींचा दुसरा मेळावा होत आहे. त्या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे नांदेडमध्ये विमानाने दाखल

मराठ्यांच्या विजयानंतर छगन भुजबळ आक्रमक
छगन भुजबळांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
‘छगन भुजबळ ‘ओबीसी आरक्षण’, ‘ओबीसी आरक्षण’, असे ओरडत फिरतात… मात्र सरकार असूनही काही करू शकले नाही

नांदेड / प्रतिनिधी ः मराठवाड्यातल्या हिंगोली येथे ओबीसींचा दुसरा मेळावा होत आहे. त्या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे नांदेडमध्ये विमानाने दाखल झाले. तिथून ते कारने हिंगोलीकडे रवाना झाले आहेत. अर्धापूरजवळील पिंपळगाव पाटीजवळ भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी वाट मोकळी करुन दिल्याने भुजबळ हिंगोलीकडे रवाना झाले. दुसरीकडे रविवारी सकाळीच स्वराज्य संघटनेने भुजबळांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे हिंगोली येथे सभास्थळी आणि नांदेड विमानतळावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. जालन्याच्या अंबडमध्ये पहिल्या सभेत भुजबळांनी आक्रमक भाषण केल्याने त्यांचा निषेध केला जात आहे.

मराठा आरक्षणाचा लढ एकीकडे सुरु असताना छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरक्षणावरून तू-तू..मैं-मैं.. होत आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. छगन भुजबळ यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची सभा घेण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही. ओबीसी समाज जशास तसे उत्तर देईल आणि भुजबळांची सभा होईल. मनोज जरांगे यांनी आंदोलकांना आवरावे, असेही आवाहन त्यांनी केले.

COMMENTS