धुळे प्रतिनिधी - धुळे महानगरपालिका हद्दीत नुकताच समावेश झालेल्या वरखेडी गावात जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या धुळे स्थानिक ग
धुळे प्रतिनिधी – धुळे महानगरपालिका हद्दीत नुकताच समावेश झालेल्या वरखेडी गावात जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पाच कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 19 जणांना अटक करण्यात आली आहे.
धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आणि नुकत्याच धुळे महानगरपालिका हद्दीत समावेश झालेल्या वरखेडी येथे आजपासून यात्रा उत्सव सुरू झाला आहे. या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात मोठ्या प्रमाणात जुगार आणि सोरट खेळले जात असल्याची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली होती, या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे काही कर्मचारी या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यांच्यावर जुगार खेळणाऱ्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पाचही पोलिस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे.
याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत पोलिसांनी 19 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस अधिकारी आणि तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या मारहाण केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. आता इतर जुगार चालवणाऱ्यांवर पोलिस काय कारवाई करतात, हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
COMMENTS