Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत शहरात माजी आमदार व नगराध्यक्षांच्या कुटुंबावर हल्ला

सात जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन गाड्या फोडल्याकर्जत ः कर्जत शहरात सिद्धार्थ नगर येथे राहत असलेले दिवंगत आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या माजी नगराध

गोव्यात दोन रशियन महिलांची हत्या
राहुरीत गुन्हेगारी वाढली, पोलिसांची पकड सैलच !
भूमापक माणिक वाघमारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

सात जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन गाड्या फोडल्या
कर्जत ः कर्जत शहरात सिद्धार्थ नगर येथे राहत असलेले दिवंगत आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलूमे यांच्यावर तसेच त्यांचे पती नंदकुमार भैलुमे व मुलगा अजय भैलुमे त्यांच्यावर मित्राला मदत करतो म्हणून  कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. सुदैवाने कोयता हुकवला व बचाव झाला मात्र दोन गाड्यांचे इनोवा गाडी एम एच-16 डीएम 7863 आणि क्रियेटा क्रमांक 16 सी वाय 7863 यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार एक जानेवारी रोजी मद्य रात्री घडला. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  माजी नगराध्यक्ष फिर्यादी प्रतिभा भैलूमे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ती आपल्या पती नंदकिशोर व मुले प्रणव व अजय यांच्यासह कर्जत येथे राहत आहे. दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 12.30 वाजता, फिर्यादी कुटुंब घरी झोपलेले असताना आरोपींनी घराच्या दरवाजाला जोरजोराने वाजवत शिवीगाळ सुरू केली. दत्ता बबन भेलुमे, अक्षय बबन भेलुमे, तेजस बबन भेलुमे, भारती बबन भेलुमे (सर्व रा. सिद्धार्थनगर, कर्जत), कार्तिक निलेश गुंड (गुंडवस्ती, कुळधरण रोड, कर्जत), शुभम सुरेश शिरोळे (बुवासाहेब नगर  कर्जत) आणि यशराज राजकुमार आढाव रा बारडगाव सुद्रिक, कर्जत) यांनी लाकडी दांडके व कोयते हातात घेऊन शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीच्या दिशेने कोयता फेकून मारला मात्र त्याखाली वाकल्या त्यामुळे वार चुकला त्यानंतर त्यांनी आजय यास लाकडी दांडक्याने मारहाण करत ठार मारण्याची धमकी देत  दोन चारचाकी गाड्यांचे कोयत्याने  मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS