Homeताज्या बातम्यादेश

राजौरीत लष्कराच्या छावणीवर हल्ला

एक जवान जखमी, गोळीबारानंतर शोध मोहीम सुरू

श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांकडून हल्ले सुरूच आहेत. अनेक दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, जम्मूमध्ये दहशतव

सीरम पाठोपाठ भारत बायोटेककडूनही कोरोना लसीच्या किमती जाहीर | ‘१२ च्या १२ बातम्या’ | Lok News24
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट
गरोदर महिलांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात

श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांकडून हल्ले सुरूच आहेत. अनेक दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, जम्मूमध्ये दहशतवादी लपून बसले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. यातच जम्मूच्या राजौरीत सोमवारी   सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला. लष्कराच्या अधिकार्‍याने सांगितले की, दहशतवाद्यांनी राजौरीतील गुंधा येथील 63 आरआर आर्मी कॅम्पवर गोळीबार केला, ज्यावर प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. यावेळी एका जवानाला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अधिक सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले. लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. 16 जुलै रोजी जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील देसामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या कॅप्टनसह 4 जवान शहीद झाले. एका पोलिसाचाही मृत्यू झाला.

COMMENTS