Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर ते मुंबई पायी आत्मकलेश यात्रा

सोलापूर प्रतिनिधी - होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करणे आणि सोलापूरच्या प्रलंबित विकासकामांसंदर्भात सरकारला जागे करण्यासाठी सोल

मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्याने उपोषण करण्याची वेळ:- क्षितिज घुले 
आरटीई गैरव्यवहाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश
नवाब मलिक आमच्यासोबत नाही

सोलापूर प्रतिनिधी – होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करणे आणि सोलापूरच्या प्रलंबित विकासकामांसंदर्भात सरकारला जागे करण्यासाठी सोलापूरातील 72 वर्षाचे अर्जुन रामगिर यांनी सोलापूर ते मुंबई आत्मकलेष पदयात्रेस सुरूवात केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सोलापूरच्या विकासासाठी कोणतीच विशेष अशी तरतुद नसल्याने शासन दरबारात सोलापूरकरांना काडीमात्र किंमत नसल्याचे सिद्ध झाले आहे. अशी संतप्त भावना अर्जुन रामगिर यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर वर जाणीवपूर्वक सरकारच्या वतीने होणार्‍या अन्याया विरोधात सोलापूरकरांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी वयाच्या 72 व्या वर्षी अर्जुन रामगिर यांनी हा संकल्प घेतला आहे. सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी हे करत असून, माझ्या हयातीत सोलापूरला जागतिक पातळीवर अव्वल मानांकित शहर म्हणून ख्याती प्राप्त झाल्याचे मला पाहायचे असलेल्याची भावना अर्जुन रामगिर यांनी व्यक्त केली आहे. अर्जुन रामगिर यांच्या वतीने काढण्यात आलेल्या सोलापूर ते मुंबई आत्मकलेष पदयात्रास सोलापूरकरांचा पाठिंबा असून अनेकांनी याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाच्यावतीने अनेक अधिकाऱ्यांनी अर्जुन रामगिर यांना विनंती करत पदयात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे. परंतु ध्येयाशी निष्ठावंत असणारे अर्जुन रामगीर हे मात्र मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी पायी मुंबईला निघाले आहेत. वाटेत मिळेल तेथे आसरा घेत ते पुढे निघत आहेत. साधारणपणे या रविवारपर्यंत ते मुंबईला पोहोचतील.

COMMENTS