Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रणवीर पंडित यांच्या व्हिजनमुळे खेळाडूंना आकर्षण – पोलीस निरीक्षक किशोर पवार

गेवराई - शिवशारदा पब्लिक स्कूलमध्ये थलेटिक्स स्पर्धा सुरूगेवराई । प्रतिनिधीआज क्रीडाक्षेत्र फार मोठे करिअर बनले आहे. प्रत्येक क्षेत्रात खेळाडूंना

सीएए कायदा : हिंदूंनाही जाचक !
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट सर्वांनी पाहावा ः विवेक कोल्हे
पंचांनीच हरवायचे ठरवले तर जिंकणार कसे ?

गेवराई – शिवशारदा पब्लिक स्कूलमध्ये थलेटिक्स स्पर्धा सुरू
गेवराई । प्रतिनिधी
आज क्रीडाक्षेत्र फार मोठे करिअर बनले आहे. प्रत्येक क्षेत्रात खेळाडूंना सवलत आणि आरक्षण आहे. रणवीर पंडित यांनी गेवराई तालुक्यात क्रीडा चळवळ गतीमान केली असून त्यांच्या व्हिजनमुळे ग्रामीण भागातून गुणवत्ता बाहेर येत आहे, असे गौरवोद्गार पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी व्यक्त केले.
जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्था आयोजित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शिवशारदा पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर 2 जानेवारी रोजी झाले. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक दिपक लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, एड. स्वप्निल येवले, सोशल मीडिया प्रमुख संदीप मडके, प्राचार्य संतोषकुमार अन्नम, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रिडा ध्वजारोहण झाले, तर अभिप्रिया मस्के या विद्यार्थिनीने खेळाडूंना शपथ दिली. महोत्सवात 18 शाळांचे संघ सहभागी असून लांब उडी, धावणे, गोळा फेक अशा चार गटातील थलेटिक्स स्पर्धा आयोजित आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य वसंत राठोड यांनी केले, तर सूत्रसंचलन कु. आराध्या येवले आणि कु. वेदिका बेद्रे यांनी केले. आयोजक रणवीर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. क्रीडा महोत्सवाचा समारोप 4 जानेवारी रोजी होणार आहे.

COMMENTS