सहायक पोलिस निरीक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहायक पोलिस निरीक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर/प्रतिनिधी : कौटुंबिक कारणातून एका सहायक पोलिस निरीक्षकाने विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवार सायंकाळी पिंपळगाव माळवी (त

पिकांना 25 हजार तर फळबागांना 50 हजार द्या ; अतिवृष्टी-गारपीट नुकसानीच्या भरपाईची मागणी,
आमदार तनपुरेंनी केली म्हैसगाव येथील पुलाची पाहणी
एकही मृत्यू होऊ देणार नाही : धनंजय मुंडे | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24 |

अहमदनगर/प्रतिनिधी : कौटुंबिक कारणातून एका सहायक पोलिस निरीक्षकाने विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवार सायंकाळी पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील तलावाजवळ ही घटना घडली. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात नियुक्ती असलेले व सध्या येथील मुख्यालयात प्रति नियुक्तीवर असलेले सहायक पोलिस निरीक्षक अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात राहतात. शनिवारी त्यांच्या कुटुंबात वाद झाले. या कारणातून सहायक निरीक्षक यांनी पिंपळगाव माळवी येथील तलावाजवळ जात विषारी औषधाचे सेवन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत कोणी नव्हते. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना दिली व स्थानिक नागरिकांनीच त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री रुग्णालयात त्यांच्या सहकार्‍यांनी मोठी गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिसांनी रुग्णालयास भेट दिली.

COMMENTS