सहाय्यक फौजदाराची झुंज अपयशी ;सेवानिवृत्तीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना निधन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहाय्यक फौजदाराची झुंज अपयशी ;सेवानिवृत्तीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना निधन

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पाथर्डी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत असलेले विश्वनाथ गोल्हार यांचे वयाच्या (अंदाजे ५७) व्या वर्षी मुंबई येथ

‘यशस्वीतेचा सुवर्णमंत्र’ या पुस्तकातून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी :- अभिनेते राहुल सोलापूरकर
सेवानिवृत्त मुख्याध्यापक लावरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शकपदी अशोक (बाबूशेठ) बोरा यांची निवड

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पाथर्डी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत असलेले विश्वनाथ गोल्हार यांचे वयाच्या (अंदाजे ५७) व्या वर्षी मुंबई येथे उपचारादरम्यान आज पहाटे निधन झाले;दरम्यान काही दिवसांत त्यांची पोलीस खात्यातील सेवा संपणार असल्याने,त्यांच्या अशा अकाली निधनाने पाथर्डी पोलीस ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सहाय्यक फौजदार गोल्हार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात काम केले होते.त्याचे मुळगाव बावी.ता.आष्टी.जि.बीड होते.अत्यंत हुशार व मितभाषी अशी तालुक्यात त्यांची ओळख होती.या आधीही काही वर्षांपूर्वी पाथर्डी पोलीस ठाण्यात पाच वर्षे कार्यरत होते.दोन वर्षोपूर्वी त्यांची सोनई पोलीस ठाण्यातून पुन्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात बदली झाली होती.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा,मुलगी असा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी आज दुपारी त्यांच्या मूळगावी येथे होणार आहे.

COMMENTS