Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी दिनानिमित्त सेलू येथे अश्ववगंधा लागवड व नोंदणी मोहिमेस प्रारंभ

लातूर प्रतिनिधी -- विलासराव देशमुख फाउंडेशन आणि ट्वेंटीवन अ‍ॅग्रीच्या वतीने महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त ट्वेंटीवन अ‍ॅग्रीच्या संचालिका सौ. अदिती

लाडशाखीय वाणी समाजाच्‍या वतीने इंग्‍शिल मिडीयम स्‍कूल, अभ्यासिकेचे उभारणी
अहमदनगर जिल्ह्यात तरूणाची निर्घृण हत्या  
हवामान बदलाचे वाढते धोके

लातूर प्रतिनिधी — विलासराव देशमुख फाउंडेशन आणि ट्वेंटीवन अ‍ॅग्रीच्या वतीने महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त ट्वेंटीवन अ‍ॅग्रीच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 जूलै रोजी रोजी लातूर तालुक्यातील सेलू येथे अशवगंधा लागवड व या योजनेत सहभाग घेण्यासाठी नोंदणी मोहिमेस प्रारंभ करण्यात करण्यात आला आहे.
विलासराव देशमुख फाउंडेशन आणि ट्वेंटीवन अ‍ॅग्रीच्या संयुक्त विद्यमानाने कृषी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये शेतक-यांनी सेंद्रिय शेतीकडे आपला कल वाढवला पाहिजे, त्याचबरोबर आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी आपले उत्पन्न वाढ व्हावी यासाठी विविध उपयोजना यावर चर्चा करण्यात आली. आजच्या काळात एकाच पिकावर अवलंबून न राहता पर्यायी पिकाची लागवड आवश्यक आहे. यामध्ये वेगवेगळ्या सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करुन आपला आर्थिक नफा वाढवावा यासाठी ट्वेंटीवन अ‍ॅग्री करीत असलेल्या औषधी वनस्पती लागवडी बाबतची सर्व शेतक-यांना माहिती देण्यात आली. तसेच विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमा बद्दलची माहिती देऊन, वृक्षारोपण करुन मेळाव्याची सांगता करण्यात आली. यावेळी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे, कृती तज्ज्ञ धनंजय राऊत, प्रगतशील शेतकरी विठ्ठल चलवाड, ज्ञानोबा सिंगापुरे, रामकिशन पाटील, जनार्धन माने, ओम अंधारे, कृषी सहाय्यक अरविंद चव्हाण, गावातील शेतकरी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अविनाश कळसे, विजयकुमार मस्के, आकाश सवाशे, सुरेंद्र गिरी, नवनाथ जाधव, पुंडलिक गव्हाणे, तुषार जाधव, मनोज गायकवाड, गजानन बोयणे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS