Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चासनळी, हंडेवाडी व कुंभारीत विकासकामांचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन

कोपरगाव ः  मागील काही वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील प्रलंबित असणार्‍या रस्ते व विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी देवून त्या समस्या सोडविण्यात

सात नंबर अर्ज भरणार्‍या सर्व शेतकर्‍यांना पाणी द्या
पर्यटन विकास आराखड्यात कोपरगावला प्राधान्य द्या
आमदार काळेंनी उपोषणाला भेट देत दिला पाठिंबा

कोपरगाव ः  मागील काही वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील प्रलंबित असणार्‍या रस्ते व विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी देवून त्या समस्या सोडविण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत.  मतदार संघातील विकास कामांचे बहुतांश प्रश्‍न मार्गी लागले असून उर्वरित विकास कामांसाठी उपलब्ध झालेल्या निधीतून आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते चासनळी, हंडेवाडी व कुंभारी येथील विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले आहे.
यामध्ये कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे 2 कोटी रुपये निधीतून मंजूर गाव ते बक्तरपूर रस्ता डांबरीकरण करणे,तसेच कुंभारी येथे 50 लक्ष रुपये निधीतून श्री राघवेश्‍वर मंदीर सुशोभीकरण करणे, हंडेवाडी येथे 40 लक्ष रुपये निधीतून रा.मा. 7 हंडेवाडी फाटा ते एकनाथ तिरसे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे, 65 लक्ष रुपये निधीतून भास्करराव तिरसे वस्ती ते हंडेवाडी गाव रस्ता डांबरीकरण करणे, 20 लक्ष रुपये निधीतून ग्रा.मा. 25 ते वडाची वाडी ते कारवाडी रस्ता डांबरीकरण करणे, आणि चासनळी येथे 2 कोटी रुपये निधीतून मंजूर गाव ते बक्तरपूर रस्ता डांबरीकरण करणे आदी कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. मतदार संघाचा सर्वांगीण विकास सुरू असून मतदार संघासाठी निधीची ओघ देखील सुरू आहे.त्यामुळे मतदार संघातील प्रत्येक गावात व कोपरगाव शहरात देखील कुठे रस्त्यांची कामे, कुठे शासकीय इमारती,तर कुठे पाणी योजना अशा प्रकारे विविध विकास कामे सर्वत्र सुरू आहेत. कधी न झालेले रस्ते होत असल्यामुळे व आपल्या गावातील देखील रस्ता झाला याचा नागरिकांना आनंद झाला असून गावा गावातील पारावर विकासाच्या चर्चा झडत आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत चाचपडत असलेल्या मतदार संघाचे चित्र पूर्णपणे बदलले असून मतदार संघातून रुसून गेलेला विकास परत आला असल्याचे जाणवत आहे. या भूमिपूजन प्रसंगी परमपूज्य श्री राघवेश्‍वरनंदगिरी महाराज,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिन्द्र बर्डे,सचिन चांदगुडे, संचालक श्रीराम राजेभोसले, माजी संचालक मिननाथ बारगळ, भिकाजी सोनवणे, सोमनाथ घुमरे, गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, सुभाषराव कदम, गौतम बँकेचे संचालक श्रीकांत तिरसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गाडे, सोशल मीडिया सेलचे सरचिटणीस सुनील गाडे, गौतम बँकेचे संचालक सुनील डोंगरे, रामराव साळुंके, सोपानराव ठाणगे, चंद्रकांत बढे, रविंद्र चिने, लक्ष्मण बढे, अण्णासाहेब बढे, दिगंबर बढे, अनिल गाडे, संतोष डोंगरे, कैलास माळी, शंकरराव चांदगुडे, ललित चांदगुडे, सुनील गाडे, मधुकर बारगळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. निवृत्ती घुमरे, अशोक मोरे, सरपंच निवृत्ती सोपानराव घुमरे, विठ्ठलराव जामदार, सुभाष शेळके, भाऊसाहेब घुमरे, मारुतीराव आढाव, गणेश घुमरे, पंडित गावंड, कारवाडीचे सरपंच मंगेश लोहकरे, परसराम वालझाडे, सचिन क्षीरसागर, देवराम गावंड, साईनाथ कोकाटे, मच्छिन्द्र ठाणगे, बाबासाहेब काशिद, कैलास कबाडी, दत्तात्रय कदम, निलेश कदम, निलेश बढे, सागर कदम, सुनील चंदनशिव, निलेश बढे उपस्थित होते.

COMMENTS