Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय कला महोत्सवात आष्टी फार्मसी कॉलेजने पटकावला द्वितीय क्रमांक

आष्टी । प्रतिनिधी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. भीमरावजी धोंडे साहेब यांच्या माता-पिता स्मृतिप्रीत्यर्थ भगवान महाविद्यालय,

वॉटर टँकमध्ये आढळला अभियंता तरुणीचा मृतदेह
बारामतीच्या ४४ गावांमध्ये शेती, पिण्यासाठी पाणी नाही… दिशाभूल करू नका…
मोटार वाईडींगचे दुकानातून 62 हजारांच्या साहित्याची चोरी

आष्टी । प्रतिनिधी
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. भीमरावजी धोंडे साहेब यांच्या माता-पिता स्मृतिप्रीत्यर्थ भगवान महाविद्यालय, आष्टी येथे आयोजित राज्यस्तरीय ‘गंगाई-बाबाजी कला रौप्य महोत्सव 2025-26’ अंतर्गत भव्य सांस्कृतिक कला स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या महोत्सवात माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
याच स्पर्धेत फार्मसी कॉलेज आष्टी ने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय पारितोषिक मिळवले. संस्थेचे अध्यक्ष भीमरावजी धोंडे साहेब आणि दमयंती ताई धोंडे यांच्या हस्ते कॉलेजला सन्मानचिन्ह तसेच 15 हजार रुपये रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. कला सादरीकरणात कॉलेजच्या कु. कांबळे मानसी, कु. गंभीरे धनश्री आणि कु. कटारनवरे श्रद्धा या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे हे सादरीकरण परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. या यशाबद्दल युवा नेते डॉ. अजय दादा धोंडे, अभय राजे धोंडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, शिवदास विधाते, माऊली बोडखे, संजय शेंडे, सागर वाघुले, संदीप नन्नवरे, प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे, प्राध्यापक आणि पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची कोरिओग्राफी सोनवसे मॅडम यांनी केली, तर कार्यक्रम उत्कृष्ट पार पडावा यासाठी कोपनर सर व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

COMMENTS