Homeताज्या बातम्यामनोरंजन

३५ वर्षांनी रिक्रिएट झाले अशोक सराफ-किशोरी शहाणेंचं ‘तुझी माझी जोडी जमली’ गाणं

मराठमोळा अभिनेता हेमंत ढोमे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो. याशिवाय

चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकली गाडी.
शंभर फूट रस्त्याचे भिजत घोंगडे अद्यापही कायम
शिखर बँकेसंदर्भात हजारेंची नवी हस्तक्षेप याचिका

मराठमोळा अभिनेता हेमंत ढोमे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो. याशिवाय त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दलती माहिती देखील तो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. हेमंत ढोमेनं नुकतीच एक आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. यानिमित्त सर्वांना हेमंतला नवीन अंदाज तर पाहायला मिळणारच आहे, शिवाय अभिनय सम्राट अशोक सराफ यांचं गाजलेले गाणे ‘तुझी माझी जोडी जमली’ देखील अनुभवता येणार आहे. हेमंत ढोमे ‘फकाट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाचे एक दमदार गाणे नुकतेच भेटीला आले आहे. अशोक सराफ यांचे गाजलेले गाणे ‘तुझी माझी जोडी जमली’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.विशेष म्हणजे या गाण्यावर हेमंत ढोमे आणि अभिनेत्री अनुजा साठे यांनी भन्नाट डान्स केला आहे. हे गाणे पाहून आपण पुन्हा जुन्या आठवणीत रमतो. कारण जुन्या गाण्याप्रमाणेच हे गाणे देखील बागेत आणि त्याच वेशभूषेत आणि तितक्याच जोषात चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS